शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहादा बसस्थानकात पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST

शहादा बसस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांची नेमणूक होत नसल्याने मोटारसायकलस्वार, वाहनचालक, अवैध प्रवासी वाहतूक चालक यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे ...

शहादा बसस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांची नेमणूक होत नसल्याने मोटारसायकलस्वार, वाहनचालक, अवैध प्रवासी वाहतूक चालक यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बसस्थानकापासून २०० मीटरच्या आत इतर वाहनांनी पार्किंग करू नये, असा नियम असताना अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक स्थानकाजवळ वाहने उभी करून व स्थानकात घुसून प्रवाशांना घेऊन जातात, तसेच प्रवाशांना घ्यायला येणारे किंवा सोडायला येणारे नातेवाईक स्थानकात जागा मिळेल तेथे वाहने उभी करीत असल्याने प्रवाशांना व बसचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय काही टवाळखोर मोटारसायकलस्वार विनाकारण स्थानकात मोटारसायकल फिरवतात. स्थानकात पोलीस नसल्याने प्रवाशांचे पाकीट मारणे, महिलांच्या गळ्यातील पोत ओढून घेणे, सामान चोरीस जाणे असे प्रकार घडतात. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी स्थानकात कायमस्वरूपी दोन पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.