शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

माहितीच्या जाळात कोरोनाचे आकडे खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत आहे़ सतत बदलणाऱ्या आकडेवारीमुळे समाजमन अस्वस्थ आहे़ परंतु दुसरीकडे केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर माहिती देणाºया शासनाच्या वेबसाईट्सवरचे आकडे भ्रमित करणारे असल्याचे समोर आले आहे़नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता़ यानंतर जून ते जुलै या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढती राहिली आहे़ एप्रिल ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात आकडेवारी ही साडेचार हजाराच्या घरात पोहोचली आहे़ यात १११ जणांचा मृत्यू तर तीन हजार नागरिकांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे़ जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत दररोज आकडेवारी प्रसारित करुन माहिती देण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाकडून दरदिवशी समोर येणाºया रुग्णांची माहिती ही सोशल मिडियातून वेळोवेळी प्रसारित करुन नागरिकांना माहिती देण्यात येत आहे़ ही बाब चांगली असली तरीही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र जिल्ह्यात कोरोनाबाधित आणि मयत यांची संख्या ही जिल्ह्यातील नियमित संख्येपेक्षा अधिकच असल्याचे समोर येत आहे़ह्या सर्व वेबसाईट्स केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याचे आहेत़ असे असतानाही आकड्यांमध्ये नियमित तफावत जिल्ह्याबाहेर राहून माहिती घेणाºया जिल्ह्यातील मूळ रहिवाशांची चिंता वाढवणारी ठरत आहे़ यात सुधार करणे करण्याची अपेक्षाही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती़ परंतू आकडेवारीत सुधारणा झालेली नाही़४नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दुपारी जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ही ४ हजार ५७२ एवढी दिसत होती़ याचवेळी राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ही संख्या ४ हजार ६७२ एवढी दिसत होती़ जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत मयतांची संख्या ही १०८ होती़ सोमवारी तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ही आकडेवारी १११ झाली़ परंतू रविवारी दुपारपासून सर्व संकेतस्थळावर १११ हीच संख्या पुढे चालवण्यात येत होती़ केंद्र शासनाच्या एका ट्रॅकिंग अ‍ॅपवर नंदुरबार जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह पेशंटची संख्या ही १ हजार १९० दिसत आहे़ प्रत्यक्षात ही संख्या १ हजार २६७ एवढी असल्याचे समोर आले होते़ ही माहिती नागरिक शेअर करत असल्याने आकड्यांची तफावत संभ्रम निर्माण करते़एकीकडे दाखल आणि मयतांच्या आकडेवारीचा गोंधळ असताना दुसरीकडे बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे़ जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ हजार ३२२ जणांना सोडून देण्यात आले आहे़ परंतु केंद्राच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी ३ हजार ३७१ एवढी दिसत आहे़ तब्बल १९१ रुग्णांच्या संख्येबाबत हा गोंधळ आहे़सोशल मिडियासोबत केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या अ‍ॅप आणि संकेतस्थळावर स्थानिक नागरिक माहिती घेऊन पडताळणी करत आहेत़ रुग्ण संख्या कमी अधिक दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गैरसमज वाढून भितीही वाढत आहे़