शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

चिनोदा चौफुलीवर ट्रक उलटल्याने टरबूज पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

कोठार : अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील तळोदा येथील चिनोदा चौफुलीवर शहादाकडून बडोद्याकडे टरबूज घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघाताची घटना घडली. ...

कोठार : अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील तळोदा येथील चिनोदा चौफुलीवर शहादाकडून बडोद्याकडे टरबूज घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघाताची घटना घडली. यावेळी चालकाला गतिरोधक लक्षात न आल्याने भरधाव ट्रक गतिरोधकावर आदळल्याने ट्रकच्या पाट्याची झोळी तुटून ट्रक उटल्याची घटना घडली.

तळोदा वळण रस्त्यावरील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुलीवर रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ट्रकचे व टरबूज मालाचे नुकसान झाले. शहाद्याकडून बडोद्याकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच- १९ झेड- ५०९३ हा टरबूज घेऊन जात होता. बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा येथील चिनोदा चौफुलीजवळ असणाऱ्या गतिरोधकावर पांढऱ्या पट्ट्याचा अभाव आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ट्रक चालकाला गतिरोधक लक्षात आले नाही. ट्रक गतिरोधकावर चढताच ट्रकच्या पुढील दोन्ही पट्यांची झोळी तुटली व ट्रकचा तोल गेल्याने ट्रक उलटल्याची घटना घडली. यात ट्रकचे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकमध्ये भरलेल्या टरबूज पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वळण रस्त्यावर अनेक ठिकाणी गितरोधक असल्याने या गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने ते चालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गतिरोधकावरील पांढऱ्या पट्ट्यांच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच संबंधित विभागाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे व फलक लावून वाहनधारकांना सोयीचे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.