शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करणार- अधिष्ठाता राजेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खान्देशसारख्या भागातील विद्यार्थी जागतिक पातळीवर संशोधन आणि गुणात्मक दृष्ट्या सरस ठरावा यासाठी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खान्देशसारख्या भागातील विद्यार्थी जागतिक पातळीवर संशोधन आणि गुणात्मक दृष्ट्या सरस ठरावा यासाठी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. अशा काळात विज्ञान व तंत्रज्ञान सारख्या विभागाचे अधिष्ठातापदावर माझी नेमणूक होणे हे माझे भाग्य आहे. या पदाला पुरेपूर न्याय देऊन विद्यार्थी घडविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे नवनियुक्त अधिष्ठाता तथा शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

अधिष्ठाता म्हणून आपली निवड झाल्यानंतर काय वाटते?

कुलगुरू डॅा.वायुनंदन यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. या पदाला न्याय देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. गेल्या ३६ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहोत. आपल्या हाताखाली आठ विद्यार्थी पीएच.डी.झाले आहेत. शेकडो रिसर्च पेपर सादर झाले आहेत. पाच वर्षांपासून एका मोठ्या नावाजलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करीत आहे. या अनुभवाचा जोरावर विद्यापीठात काम करणार आहे.

कुठल्या कामाला प्राधान्य राहील?

बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाचा विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचा अभ्यासक्रम तयार करण्याला प्राधान्य असेल. विद्यापीठातून तयार झालेला विद्यार्थी जगात कुठेही गेला तरी तो टिकेल, अव्वल राहील असा त्याला घडविला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न असेल. संशोधनाचा दर्जा उंचावणे, ग्रामिण भागातील विद्यार्थी संशोधनासाठी पुढे यावा यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. कुलगुरू हे ब्रॅाड माईंडेड आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची गुणात्मक, विकासात्मक घौडदौड कायम राहणार आहे. त्याच्या विश्वासाला आपण पात्र ठरू यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.

पहिले प्रोफेसर...

जिल्ह्यातील पहिले प्रोफेसर म्हणून नियुक्त होण्याचा मान डॅा.राजेंद्र पाटील यांना मिळाला आहे. ३६ वर्ष त्यांनी अध्यापन केले असून पाच वर्षापासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले असून देशपातळीवर ते आपापल्या क्षेत्रात अव्वलस्थानी आहेत.

चौथे अधिष्ठाता...

जिल्ह्यात आतापर्यंत तीन जणांना अधिष्ठातापद विद्यापीठात मिळाले आहे. प्राचार्य डॅा.पाटील हे चौथे आहेत. शिवाय विज्ञान विभागातील पहिलेच प्रोफेसर आहेत. त्यामुळे जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

सर्वच घटकांचे सहकार्य...

प्राचार्य डॅा.राजेंद्र पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच घटकांचे सहकार्य मिळाले आहे. संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक मकरंद पाटील, पी.आर.पाटील, सर्व सहकारी प्राध्यापक मंडळी यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.