शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, सीबीआय चौकशीची मागणी करणार- खासदार हीना गावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:28 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर, धडगाव व नवापूर......... तालुक्यांत प्रधानमंत्री आवास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून, यात वर्ग एक ते ...

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर, धडगाव व नवापूर......... तालुक्यांत प्रधानमंत्री आवास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून, यात वर्ग एक ते चारचे अधिकारी गुंतले आहेत. या सर्व प्रकरणाचे पुरावे आपण पंतप्रधानांना देणार असून, त्यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार डॉ. गावित म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेत जवळपास चार हजार घरकुलांचा घोटाळा झाला आहे. दिशा समितीच्या बैठकीत अध्यक्ष या नात्याने याबाबत कागदपत्रांसह पुरावे आपण सादर केले. चौकशीच्या सूचना दिल्या, परंतु काहीही हालचाल होत नाही. याला कारण या भ्रष्टाचारात टॉप ते बॉटम लेव्हलचे अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे ते सर्व एकमेकांना वाचवत आहेत. आपल्याकडे असलेली कागदपत्रे आणि पुरावे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असून, त्यांना सीबीआय चौकशीची विनंती करणार आहोत.

या गैरप्रकारात यादीतील नावांऐवजी दुसऱ्यांनाच घरे देणे, खोटे जीओ टॅगिंग करणे, पैसे घेऊन यादीत दुसरी गावे टाकणे असे प्रकार झाले आहेत. त्यामुळे खरे पात्र लाभार्थी त्यात वंचित राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित उपस्थित होते.