शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला विक्रेत्यांची तळोदा बसस्थानकात सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील भाजीपाला विक्रेते व फेरीवाल्यांना पालिकेतर्फे बसस्थानकात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील भाजीपाला विक्रेते व फेरीवाल्यांना पालिकेतर्फे बसस्थानकात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी तेथेच दुकाने लावावीत. जे व्यावसायिक रस्त्यावर गाड्या उभ्या करतील. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. दरम्यान बुधवारी व्यावसायिकांसाठी पालिकेने शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आॅईल मीलच्या जागेवर जागा निश्चित केली होती. परंतु विरोध झाल्यामुळे एका रात्रीतून प्रशासनास निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे प्रशासन व पालिकांमधील समन्वयाचा अभाव विषयी एकच चर्चा होती.दिवसा गणिक कोरोना महामारीच्या संसर्गात अधिक वाढ होत आहे. साहजिकच प्रशासनाची चिंतादेखील वाढली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्येही बदल करण्यात येत आहे. विशेषत: भाजीपालाच्या बाजारात सद्या मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते व इतर किरकोळ व्यावसायिकांच्या जागेत पालिकेने बदल करण्याचे नियोजन केले आहे. या व्यावसायिकांसाठी पालिकेने सुरूवातीला शहरापासून तब्बल एक किलोमीटर अंतर असलेल्या भारत आॅईल मीलची जागा निश्चित केली होती. त्याठिकाणी तालुका प्रशासनाच्या उपस्थितीत पालिकेने जागेची साफ-सफाईदेखील केली होती. तथापि एवढ्या लांब अंतरावर ग्राहक येणार नाहीत. ही शक्यता लक्षात घेऊन व्यावसायिकांनी तेथे जाण्यास स्पष्ट नकार देत दुसऱ्या म्हणजे नजिकच्या ठिकाणाला पर्याय दिला होता. याबाबत पालिका पदाधिकारी, प्रशासन व महसूल प्रशासनाने आपसात चर्चा करून बसस्थानकाची जागा निश्चित करून थेट आखणी केली.एका रात्रीतून जागेचा फेर निर्णय बदलल्यामुळे नागरिकांबरोबरच व्यावसायिकही अवाक् झालेत. पालिका व महसूल प्रशासनाच्या समन्वयाअभावी पालिकेचा खर्च वाया गेलाच. परंतु कर्मचाऱ्यांची मेहनतदेखील निष्फळ ठरली. दरम्यान पालिकेने भाजी, फळ विक्रेते व इतर किरकोळ व्यावसायिकांना बसस्थानकात पुरेशी जागा उपलब्ध करून दिली आहे. आता त्यांनी येथेच आपली दुकाने थाटावी. रस्त्यावर दुकाने लावलीत तर अशा व्यावसायिकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक खोळंबल्यामुळे वरूनच माल मिळत नसल्याचे सबब पुढे करत शहरात अजूनही काही व्यापारी चढ्या दराने मालाची विक्री करत नागरिकांची आर्थिक लुट करीत असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावले आहे. वास्तविक हा प्रकार सर्रास घडत असल्याचे नागरिक सांगत असतांना प्रशासन त्यांना साधी ताकीद द्यायलाही तयार नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.