शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सातपुड्यातील विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या आॅनलाईन पद्धतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या आॅनलाईन पद्धतीने देता येतील याअनुषंगाने १५ सप्टेंबरपासून अंतिम वर्षाच्या आॅनलाईन तोंडी परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यासाठी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ ठरवून दिला आहे. परंतु आॅनलाईन तोंडी परीक्षा वेळेत न होता दुपारी चार ते पाच वाजेपावेतो सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना टेकड्यांवर वेटींगवर थांबावे लागत आहे.आधीच अतिदुर्गम भागात नेटवर्क नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या शोधात पहाडात टेकड्या चढाव्या लागत आहेत. त्यात जोरदार पाऊस, वारा-वादळ, विजांचा कडकडाटात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागत असल्याचे चित्र आहे. आॅनलाइन परीक्षा देण्यासाठी अतिदुर्गम भागातील मोलगी, दहेल, तोरणमाळ आदी ठिकाणचे विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या शोधात सकाळपासून आपल्या घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर पायपीट करीत पहाडात टेकड्यांवर यावे लागत आहे. त्यात ११ वाजेपासून दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत आपला नंबर येतो तोपावतो मोबाईल समोर धरून बसावे लागत आहे तर काहींच्या मोबाईलची चार्जिंगही संपत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यात पावसाचे दिवस असल्याने जोरदार पावसाला सामोरे जाऊन थंडीवाऱ्यात बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. संबंधित महाविद्यालयाने दिलेल्या वेळेत तोंडी परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबणार आहेत.