महिला रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:14 IST2020-07-22T12:14:26+5:302020-07-22T12:14:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिला रुग्णालयाच्या नवीन इमारतीत कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याने इमारतीची आवश्यक कामे ३१ ...

Complete the work of the women's hospital immediately | महिला रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा

महिला रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिला रुग्णालयाच्या नवीन इमारतीत कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याने इमारतीची आवश्यक कामे ३१ जुलै पर्यंत पूर्ण करावीत़ तसेच आॅक्सिजन व्यवस्थादेखील त्वरीत निर्माण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी दिले़
डॉ.भारुड यांनी मंगळवारी इमारतीला भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये उपस्थित होते़ भेटीदरम्यान डॉ़ भारूड यांनी रुग्णांना सर्व चांगले उपचार दिले जातील यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात याव्यात, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे, बेड्स व इतर व्यवस्था त्वरीत करावी व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात इमारतीचा उपयोग होईल असे नियोजन करण्याचे आदेश दिले़

Web Title: Complete the work of the women's hospital immediately