शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जिल्ह्यात उद्यापासून पुन्हा थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात वातावरण पुन्हा कोरडे होऊन दि. २१ जानेवारीपासून किमान तापमानामध्ये घसरण होऊ शकते, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात वातावरण पुन्हा कोरडे होऊन दि. २१ जानेवारीपासून किमान तापमानामध्ये घसरण होऊ शकते, असा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी वर्तविला आहे. जिल्ह्याच्या काही भागात उद्या, गुरुवारपासून हा फरक जाणवू शकेल. जिल्ह्यातील किमान तापमान सध्या चढे जाणवत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये हा पारा पुन्हा किंचित खाली जाऊन थंडीच्या पुढच्या टप्प्याचा अनुभव मिळू शकेल. कृषी विज्ञान केंद्रातील कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारीपासून उत्तर मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणामध्ये थंडीची जाणीव होईल. जिल्ह्याच्या किमान तापमानाचा पारा येत्या २४ तासांमध्ये १३, तर त्यानंतरच्या २४ तासांमध्ये १२ अंशांपर्यंत खाली उतरेल, अशी शक्यता आहे. त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल. कच्छमध्ये १९ आणि २० जानेवारीला शीतलहरीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणवू शकेल. शेतकऱ्यांनी थंडीपासून संरक्षणासाठी पिकास पाणी द्यावे, जेणेकरून जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. केळी आणि पपईच्या फळास प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे. थंड वाऱ्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे.