शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीचे जाळे ठरतेय लॉकडाऊनमध्ये उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी काळात शहरात लावण्यात आलेले ३० पेक्षा अधीक सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर मदत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी काळात शहरात लावण्यात आलेले ३० पेक्षा अधीक सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर मदत करीत आहेत. या कॅमेऱ्यांच्या आधारेच जेथे जास्त गर्दी होत असेल तेथे पोलीस पथक पाठवून नियंत्रण आणले जात आहे. दरम्यान, ८८ लाख रुपये खर्च करून नवीन ९० कॅमेरे बसविण्याचे बारगळे आहे. हे कॅमेरे देखील बसविले गेले असते तर आज संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात ते मोठ्या प्रमाणावर सहाय्यकारी ठरले असते.कोरोनामुळे गेल्या २३ मार्चपासून राज्य शासनाने आणि त्यानंतर केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यातच संचारबंदी देखील जाहीर करण्यात आली आहे. या काळात पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. आधीच आरोग्याची काळजी आणि त्यात बंदोबस्ताचा ताण यामुळे पोलीस कर्मचारी दुहेरी कसरत करीत आहे. त्यांच्या जोडीला होमगार्डही तैणात असले तरी मर्यादा येत आहे. परंतु या सर्वांमध्ये शहरात लावण्यात आलेले ३० सीसीटीव्ही कॅमेरे सध्या पोलीस प्रशासनाला मोठा आधार ठरले आहेत.संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना सकाळी ८ ते १२ वाजेची वेळ दिली गेली आहे. या काळात बाजारात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची कसरत होते. परंतु सर्वच मुख्य बाजारपेठ आणि चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे पोलिसांना लागलीच गर्दीवरील नियंत्रणाचे नियोजन करण्यात मदत होत आहे.शहरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे नियंत्रणकक्ष पुर्वी टिळक रोडवरील फडके चौकीत होते. परंतु मध्यवर्ती आणि संवेदनशील भाग असल्यामुळे हे नियंत्रणकक्ष पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. त्यामुळे या ठिकाणाहून या कॅमेºयांचे नियंत्रण केले जाते तसेच त्यावर देखरेख ठेवली जाते.विनाकारण फिरणाºयांवरही वचकसंचारबंदी काळात विनाकारण फिरणारे टोळके विविध चौकात दिसून येतात. सीसीटीव्ही मध्ये ते दिसताच लागलीच नियंत्रण कक्षातून पेट्रोलिंगच्या वाहनाला कळविले जाते. परिणामी अशा ठिकाणी लागलीच वाहन किंवा पथक पोहचून अशा रिकामटेकड्यांवर नियंत्रण आणले जाते. याशिवाय ज्या भागात विनाकारण गर्दी करणारे, खरेदीसाठी गर्दी करणारे किंवा पोलिसांशी हुज्जत घालणारे असतात तेथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर पाळत ठेवून पोलिसांना कारवाई करणे सोपे जाते.बाहेरच्या लोकांवर नजरया माध्यमातून शहराबाहेरून आलेले, अनोळखी व्यक्ती यांना ट्रेस करणे देखील या निमित्ताने सोपे जात आहे. काही शहरांमध्ये ड्रोनचा आसरा घेतला जात आहे. परंतु नंदुरबारात आहे त्याच सीसीटीव्ही कॅमेरा नेटवर्कचा पोलीस प्रशासन खुबीने उपयोग करून घेत असल्याचे दिसून येत आहे.प्रस्ताव बारगळला... चार वर्षांपूर्वी डीपीडीसीतून ८८ लाख रुपये नवीन कॅमेºयांसाठी मंजुर करण्यात आले होते. मंजुर निधीतून तब्बल ९० कॅमेरे बसविण्यात येणार होते. यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये उच्च दर्जाचे कॅमेर अर्थात एएनपीआर दर्जाचे कॅमेरे राहणार होते. या कॅमेºयांचे वैशिष्टे म्हणजे कितीही वेगाने अर्थात १४० किलोमिटर प्रती तास या वेगाने जरी वाहन गेले व कॅमेºयाची नजर जर त्या वाहनाच्या नंबर प्लेटवर गेली तर ती नंबर प्लेट कॅच करण्याची क्षमता या कॅमेºयांमध्ये होती. त्यामुळे बाहेरून संशयीत वाहने, अवैध वाहतुकीची वाहने, संशयीत व्यक्ती यांच्यावर नजर ठेवली जाणार होती. परंतु तो प्रस्ताव बारगळला आहे. ते कॅमेरे बसविले गेले असते तर लॉकडाऊनच्या काळात त्यांची मोठी मदत कायदा व सुव्यवस्थेसाठी राहिली असती.