शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेपाडालगतचे ३०० हेक्टर जंगल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा शिवारातील राखीव वनक्षेत्राला आग लागून ३०० हेक्टरचे जंगल जळून खाक झाले. सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा शिवारातील राखीव वनक्षेत्राला आग लागून ३०० हेक्टरचे जंगल जळून खाक झाले. सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास लागलेली आग मंगळवारी सकाळी आठ वाजता आटोक्यात आली. नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत वनविभागाची ठाणेपाडा गावाजवळ रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेपासून साक्री तालुक्यातील सिंदबनपर्यंत ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात विस्तीर्ण असे वनक्षेत्र आहे. रोपवाटिकेलगत वनविभागाने ४०० हेक्टर वनक्षेत्र राखीव ठेवत त्याठिकाणी बांबू रोपवन व गवताची लागवड केली होती. सोमवारी रात्री ११. ३० वाजेच्या सुमारास या राखीव वनक्षेत्रात आग लागल्याचे ठाणेपाडा ग्रामस्थांना दिसून आले. अवघ्या काही वेळात ही आग फोफावून आसपास जंगलात वाढत गेली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिका-यांना माहिती दिल्यानंतर सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्रत अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनपाल आणि वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतू जोरदार हवेमुळे आग पसरत राहिल्याने आटोक्यात आणणे मुश्किल होत होते. अग्नीशमन बंब बोलावूनही फरक पडत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार तसेच ठाणेपाडा गावचे यांच्यासह ग्रामस्थांनी धाडस करुन वनकर्मचा-यांसोबत गवताळ भागात खोदकाम तसेच गवत कापणी सुरु करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ३०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी पहाटेपासून गवत कापण्यास सुरुवात केल्याने सकाळी आठ वाजता आग आटोक्यात आली. आगीत बांबू रोपवन व गवत जळून खाक झाले असून वन्यप्राणी यातून बचावले असल्याचे सांगण्यात आले आहे. या जंगलात दोन बिबट, काळवीट, सायाळ आणि ५०० पेक्षा अधिक मोर आहेत.