शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

विजापूर येथे अडीच एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:28 IST

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार रात्री १० वाजेच्या सुमारास विजापूर गावात बाबूराव गावित यांच्या शेतातील साडेचार एकर मधील अडीच एकरामध्ये ...

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार रात्री १० वाजेच्या सुमारास विजापूर गावात बाबूराव गावित यांच्या शेतातील साडेचार एकर मधील अडीच एकरामध्ये उसाला आग लागल्याने ऊस जळून खाक झाला. आग लागताच परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु हवेचा वेग जास्त असल्याने आग झपाट्याने पसरली. प्रल्हाद गावित यांनी तात्काळ नवापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला संपर्क करून पाचारण करण्यात आले. घटनास्थळी अग्निशामक बंब दाखल झाल्याने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु आगीत अडीच एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सकाळी तलाठी व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. साधारण दोन लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनामाचा शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. महसूल प्रशासनाने शेतकरी बाबुराव गावित यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.