शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’ देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:21 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ‘उभारी’ उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना उदरनिर्वाहासाठी उपयुक्त साहित्याचे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ‘उभारी’ उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना उदरनिर्वाहासाठी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा आदी उपस्थित होते.  जिल्ह्यातील ११ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शिलाई मशिन, बहुउद्देशिय कल्टीवेटर, फवारणी पंप, आणि  ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. एकूण २८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अशा स्वरुपाची मदत देण्यात येणार आहे.          नंदुरबार तालुका कृषि निविष्ठा संस्थेतर्फे २० कल्टीव्हेटर, लायन्स क्लबतर्फे २० फवारणी पंप, तनिष्का महिलागटातर्फे २० ब्लँकेट आणि विश्व मानव रुहानी केंन्द्रातर्फे २० शिलाई मशीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संस्थांनी सेवाभावनेने केलेले कार्य इतरानाही प्रेरक असल्याचेही यावेळी गमे म्हणाले. त्यांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नाशिक विभागात गमे यांच्या संकल्पनेनुसार ‘उभारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध संस्था आणि दानशूर व्यक्तीच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक साधन साहित्य या उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.रेलू वसावे यांचा सत्कारविभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा सत्कार करण्यात आला.  माता आणि बालकाच्या पोषणासाठी स्वत: बोट चालवून विविध पाड्यांपर्यंत पोषण आहार पोहचविण्याचे रेलूताईंचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी गमे म्हणाले. दुर्गम भागातील अंगणवाड्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर विभागीय आयुक्तांनी नियोजन भवन इमारत बांधकामाची पाहणी केली. इमारतीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त  केले.