‘आशा स्वयंसेविके’ने प्रसंगावधान राखत वाचवले तीन जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST2021-03-07T04:28:17+5:302021-03-07T04:28:17+5:30

दरम्यान आशा पाडवी यांना सायंकाळच्या वेळेस अचानक पोटात दुखू लागल्याने आशा स्वयंसेविका अनिता ठाकरे यांना बोलावण्यात आले. त्यांनी लागलीच ...

Asha Swayamsevak saved three lives | ‘आशा स्वयंसेविके’ने प्रसंगावधान राखत वाचवले तीन जीव

‘आशा स्वयंसेविके’ने प्रसंगावधान राखत वाचवले तीन जीव

दरम्यान आशा पाडवी यांना सायंकाळच्या वेळेस अचानक पोटात दुखू लागल्याने आशा स्वयंसेविका अनिता ठाकरे यांना बोलावण्यात आले. त्यांनी लागलीच प्रसंगावधान राखत आपला जास्त वेळ वाया जाणार नाही, याबाबत काळजी घेत प्राथमिक आरोग्य केंद्र प्रतापपूर येथील रुग्णवाहिका बोलावून गरोदर आशा पाडवी यांना उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी घेऊन जात असताना रांझणी फाट्यापुढे प्रसूतीकळांमध्ये वाढ झाल्याने आशा स्वयंसेविका ठाकरे यांनी आशा पाडवींची काळजी घेत धीर दिला व रुग्णवाहिकेतच त्यांनी कन्येला जन्म दिला. या वेळी अनिता ठाकरे यांनी नवजात कन्या शिशूला सांभाळत उपजिल्हा रुग्णालय गाठून तेथे वैद्यकीय अधिकारींसह योग्य ती खबरदारी घेत प्रसूती करत दुसऱ्या बाळाचाही जन्म झाला.

दरम्यान, दोन्ही नवजात शिशूंचे वजन प्रत्येकी दोन किलो ग्रॅम होते. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे संदर्भसेवेसाठी पाठविण्यात आले आहे. नवजात शिशूंना जिल्हा रुग्णालयात अतिक्षता विभागात ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सुरुवातीला गावागावात जाऊन गरोदर मातांना भेटून संस्थेतच प्रसूती करण्यासाठी खूप समजवावे लागत होते. परंतु आता गरोदर माता व तिच्या नातेवाइकांचीही संस्थेत प्रसूतीसाठी मानसिकता तयार झाल्याने सुरक्षित बाळंतपण होण्यास मदत होऊन माता व बालकांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरत आहे. तसेच तालुका आरोग्य विभागाकडूनही नेहमीच कामांबद्दल कौतुकीची थाप मिळत असल्याने उत्साह वाढण्यास मदत होत आहे. - अनिता ठाकरे, आशा स्वयंसेविका, रांझणी

Web Title: Asha Swayamsevak saved three lives