सात वर्षानंतर बस सेवेमुळे शिक्षणासाठी पायपीट थांबणार

By Admin | Updated: May 8, 2017 15:54 IST2017-05-08T15:54:05+5:302017-05-08T15:54:05+5:30

तळोदा तालुक्यात बोरद ते लाखापूर अशी आठ किलोमीटरची होणारी पायपीट यंदा थांबणार आह़े सात वर्षापासून रस्त्याअभावी बंद बस सुरू झाल्याने ही समस्या निकाली निघाली आह़े

After seven years, the bus service will be stopped by the bus service | सात वर्षानंतर बस सेवेमुळे शिक्षणासाठी पायपीट थांबणार

सात वर्षानंतर बस सेवेमुळे शिक्षणासाठी पायपीट थांबणार

 बोरद,जि.नंदुरबार - शिक्षणासाठी पाचवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा:या  विद्याथ्र्याची दररोज तळोदा तालुक्यात बोरद ते लाखापूर अशी आठ किलोमीटरची होणारी पायपीट यंदा थांबणार आह़े सात वर्षापासून रस्त्याअभावी बंद बस सुरू झाल्याने ही समस्या निकाली निघाली आह़े 

तळोदा तालुक्यातील बोरद ते लाखापूर हा चार किलोमीटरचा रस्ता सात वर्षापूर्वी पूर्णपणे खराब झाल्याने तळोदा बसस्थानकातून सोडण्यात येणारी लाखापूर ते तळोदा बस बंद करण्यात आली होती़ यामुळे लाखापूर येथून शिक्षणासाठी येणा:या विद्याथ्र्याची पायपीट सुरू झाली होती़ याबाबत पंचायत समितीच्या विद्यमान सभापती शांतीबाई पवार यांनी गेल्या वर्षभरापासून पालकमंत्री जयकुमार रावल व जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरू केली होती़ यानुसार गेल्या वर्षभरात बोरद ते लाखापूर या दरम्यान रस्ता तयार करण्यात आला. मात्र त्यानंतरही बस सुरू न झाल्याने शांतीबाई पवार यांनी पुन्हा पालकमंत्री यांना माहिती देऊन बस सुरू करण्याची मागणी केली होती़ या मागणीनुसार तळोदा ते लाखापूर बस सुरू करण्याचे आदेश काढण्यात आले आह़े या आदेशांनुसार ही बस सुरू झाली आह़े 

Web Title: After seven years, the bus service will be stopped by the bus service