शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात ५० दुचाकी चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारण नसताना विनाकारण शहरात फिरू नका, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारण नसताना विनाकारण शहरात फिरू नका, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत होते. तरीही दुचाकींची संख्या कमी न होता वाढतच होती. त्यानुसार प्रशासनाने बुधवार व गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या ५० जणांची दुचाकी जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजाराप्रमाणे ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सुविधा वगळण्यात आलेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना सूट देण्यात आलेली आहे. त्याचा काही जण गैरफायदा घेताना दिसतात. एकदा भाजीपाला, किराणा भरल्यानंतर किमान सात ते आठ दिवस घराबाहेर पडू नये असे असताना दररोज किराणा, भाजीपाला घेणाऱ्यांची संख्या वाढतेच कशी हादेखील प्रश्न आहे. आपल्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात पायी जाऊन एकाने जीवनावश्यक वस्तू आल्यानंतर पुन्हा पुन्हा जाण्याची आवश्यकता नसते. हे लक्षात आल्याने प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासनाने अशा विनाकारण फिरणाºयांवर कारवाई करत त्यांना लाठीचा प्रसाद दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेट बँक चौक परिसरात विनाकारण फिरणाºया ५० दुचाकी वाहनांवर कारवाई करत जुन्या पोलीस स्टेशनला वाहने जमा करण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू लावल्यापासून प्रशासनाच्या वतीने वारंवार कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत होते. तरीही काही हुल्लडबाजी करत गावात फिरत होते. यामुळे रस्त्यांवर दुचाकींची संख्या वाढल्याने प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाºयांनी ही कारवाई केली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायला एकट्यानेच घराबाहेर पडावे. मुलगा किंवा महिलेला सोबत आणू नये. तसेच जे काही विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत व गल्लीबोळात गर्दी करून बसत आहेत. अशांवर कारवाई करत वाहने जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे.-डॉ.चेतन गिरसे, प्रांताधिकारी, शहादा.पोलिसांच्या वतीने विविध भागात जाऊन कारण नसताना बाहेर पडू नका अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही काही कारण नसताना बाहेर पडत आहेत व सर्वांचे जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.-किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, शहादा.

अक्कलकुवा शहरात विनाकारण भटकाणाऱ्यांवर कारवाई, १७ दुचाकी जप्त

अक्कलकुवा येथे पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, व तहसीलदार विजय कच्छवे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी दोन दिवसात १७ मोटारसायकली जप्त त्यांच्या करुन त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण फिरणाºया तिघांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ अक्कलकुवा शहरात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत ेिठकेिठकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी करुन त्या जमा करण्याचे सत्र सुरु आहे़ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन, हेड कॉन्स्टेबल शिरसाळे, मोहने वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय धनगर, शरद पाटील, कन्हैयालाल परदेशी यांनी ही कारवाई केली़