नंदुरबारात जुगार खेळणाऱ्या दहा जणांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:18 IST2020-07-22T12:18:22+5:302020-07-22T12:18:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील स्टेशन रोड परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करुन जुगार खेळणाºया १० जणांवर पोलीसांनी कारवाई ...

Action against ten gamblers in Nandurbar | नंदुरबारात जुगार खेळणाऱ्या दहा जणांविरोधात कारवाई

नंदुरबारात जुगार खेळणाऱ्या दहा जणांविरोधात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील स्टेशन रोड परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करुन जुगार खेळणाºया १० जणांवर पोलीसांनी कारवाई केली़ सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास झालेल्या कारवाईत १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
स्टेशन रोडवरील यश कॉम्पलेक्समध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने येथे धाड टाकली़ याठिकाणी नटवरलाल कमलनाथ कडोसे, राहुल भिका चौधरी, सद्दाम मलिक समद मलीक, हरीष भास्कर मराठे, अनिल चुनीलाल खेडकर, किसन हिरालाल खेडकर, सादिक शेख युनूस, अश्विन अनिलसिंग परेदशी, मनिष मदन संगत व दिपक सखाराम चौधरी सर्व रा़ नंदुरबार यांंचा समावेश होता़ त्यांच्याकडून ९ मोबाईल, एक दुचाकी आणि जुगाराच्या साधने असा १ लाख ८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यांच्याविरोधात पोलीस नाईक राकेश मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण करत आहेत़

Web Title: Action against ten gamblers in Nandurbar