शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासकीय गोदामातून लाभार्थींना वाटप करण्यासाठी घेतलेले स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जाणाऱ्या दुकानदारावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय गोदामातून लाभार्थींना वाटप करण्यासाठी घेतलेले स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जाणाऱ्या दुकानदारावर पुरवठा विभागाने कारवाई केली़ याप्रकरणी रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आत्र्या पाच्या वळवी रा़ चिखली ता़ नवापूर असे स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे़ रविवारी आत्र्या वळवी याने चिखली गावातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करता यावे यासाठी नवापूर येथील शासकीय गोदामातून ५१ हजार ६०० रूपये किमतीचे आठ क्विंटल गहू उचल केली होती़ हा गहू जीजे १९ यू २०९७ या रिक्षाने घेऊन गेला होता़ चिखली ग्रामस्थांना दुकानदार आत्र्या वळवी हा चिंचपाडा ते खर्जे गावाच्या रस्त्यावर दुकानात गहू उतरवत असल्याचे दिसून आले होते़ त्यांनी त्यास हटकल्यानंतर दुकानदाराने पुन्हा गहू रिक्षात टाकून पळ काढला होता़ ग्रामस्थांनी ही माहिती पुरवठा विभागाला दिल्यानंतर त्याला रस्त्यात थांबवून विचारणा करण्यात आली़ याप्रकारानंतर पुरवठा विभागाने चौकशी करत सोमवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली़ याबाबत रविंद्र कानडे यांच्या फिर्यादीवरून दुकानदार आत्र्या पाच्या वळवी, भैरूशेठ अग्रवाल रा़ चिंचपाडा व दिलीप केला पाडवी रा़ अंजणे अशा तिघांविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत करत आहेत़

रेशनदुकानदारासह दोघांविरूद्ध भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ नवापूरात प्रथमच एखाद्यावर या कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत़