पतसंस्थेच्या लकी ड्रॉमध्ये 10 लाखांची फसवणूक

By Admin | Updated: May 9, 2017 00:11 IST2017-05-09T00:11:10+5:302017-05-09T00:11:10+5:30

17 जणांविरुद्ध गुन्हा : पतसंस्था सभासदाने दिली फिर्याद

10 lakh fraud in credit society lucky draw | पतसंस्थेच्या लकी ड्रॉमध्ये 10 लाखांची फसवणूक

पतसंस्थेच्या लकी ड्रॉमध्ये 10 लाखांची फसवणूक

नंदुरबार : शहरातील फैज नागरी सहकारी पतसंस्थेत लकी ड्रॉ व बचत ठेव योजनेतून 10 लाख 28 हजार 400 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारात फैज नागरी सहकारी पतसंस्था चालविली जाते. या पतसंस्थेत मार्च 2014 ते एप्रिल 2017  या काळात संचालक मंडळ व एजंट यांनी पतसंस्थेच्या कर्जाची व   लकी ड्रॉबाबतची खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक केली. मासिक बचत ठेव योजनेत सभासद करून घेण्यात आले. त्या माध्यमातून तब्बल 10 लाख 28 हजार 400 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद गुलामअली मसुदखान पठाण, रा.जामा मशिदीजवळ यांनी दिली.
त्यावरून शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी, शेख वहाब शेख चाहतअली, सैयद अजहरमियाँ मजहरमियाँ, राहतअली चाहतअली, शेख बाबूलाल शेख उस्मान धोबी, शेख अहमद हाजी कुरेशी, शेख हारुन शेख हाजी, अब्दुल रज्जाक कुरेशी, गनी इस्माईल भाई मेमन, शेख कादीर शेख हाजी शेख अमीर, शेख संगीनाबी शेख रोशन कुरेशी, तस्लीमबी लतीफ शहा, लतीफ शहा सिकंदर शहा, सैयद इम्तियाज अली शब्बीर अली, मोहसीन शहा लतीफ शहा, सैयद मोहसीन सैयद समद, शेख खलील अब्दुल समद कुरेशी, शेख रफिक शेख शफी, सर्व रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 10 lakh fraud in credit society lucky draw