"मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीये", शिंदेसेनेच्या मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:13 IST2026-04-13T20:12:32+5:302026-04-13T20:13:13+5:30

"फोन उचलत नाहीत, अशांना घरचा रस्ता दाखवा", श्रीकांत शिंदेंसमोर जाहीर मागणी.

Shinde sena MLA Santosh Bangar Slams Own Ministers: "Power Has Gone to Their Heads." | "मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीये", शिंदेसेनेच्या मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांचा घरचा आहेर

"मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीये", शिंदेसेनेच्या मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांचा घरचा आहेर

नांदेड: शिंदे सेनेच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी नांदेड शहरात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांची जाहीर वाभाडे काढले. "काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत," अशा शब्दात बांगर यांनी मंत्र्यांना घरचा आहेर दिला.

श्रीकांत शिंदेंसमोर मांडली कैफियत
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बांगर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "काही मंत्री फोन उचलत नाहीत, सामान्य कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची कामे करत नाहीत. अशा मंत्र्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे." भर व्यासपीठावरून मंत्र्यांवर करण्यात आलेल्या या टीकेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.

गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत टीकेचे बाण
विशेष म्हणजे, व्यासपीठावर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील बसलेले असतानाही बांगर यांनी टीकेचा सूर कायम ठेवला. "मंत्र्यांनी जमिनीवर राहून काम करणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही," अशी तक्रार त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली. या विधानामुळे शिंदे गटामध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Web Title : नांदेड़ में शिंदे सेना की बैठक में विधायक बांगर ने मंत्रियों की आलोचना की।

Web Summary : नांदेड़ में शिंदे सेना की बैठक में, विधायक संतोष बांगर ने कुछ मंत्रियों की खुले तौर पर आलोचना की और उन पर पहुंच से बाहर होने का आरोप लगाया। उन्होंने सांसद श्रीकांत शिंदे और मंत्री गुलाबराव पाटिल की उपस्थिति में अपनी चिंता व्यक्त की और मंत्रियों और पार्टी कार्यकर्ताओं के बीच संबंध न होने पर प्रकाश डाला।

Web Title : MLA Bangar criticizes ministers at Shinde Sena meeting in Nanded.

Web Summary : At a Shinde Sena meeting in Nanded, MLA Santosh Bangar openly criticized some ministers for being out of touch and inaccessible. He voiced his concerns in the presence of MP Shrikant Shinde and Minister Gulabrao Patil, highlighting the disconnect between ministers and party workers.