शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचे दोन्ही डोळे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:56 IST

प्रतिकार करून आरडाओरड केल्याने अस्वलाने जंगलात ठोकली धूम

ठळक मुद्देजखमी अवस्थेत शेतकऱ्याने केला मित्रांना फोनशेतालगत असलेल्या जंगलातून आलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला़

किनवट (जि़नांदेड) : शेतातील कापूस व तूर या पिकांची रखवाली करणाऱ्या शेख जावीद शेख मुबारक या २७ वर्षीय विवाहित युवा शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला़ यामध्ये सदर युवक गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. ही घटना ५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मलकवाडी जंगलालगतच्या शेतात घडली़ 

शेख जावीद (रा़ चिखली (बु), ता. किनवट) हा युवा शेतकरी मलकवाडी शिवारातील शेतात ५ डिसेंबर रोजी दुपारच्यावेळी तूर व कापूस या पिकांची रखवाली करीत होता़ दरम्यान, शेतालगत असलेल्या जंगलातून आलेल्या अस्वलाने अचानक येऊन हल्ला केला़ यामध्ये तो गंभीर जखमी झाला़ तसेच त्याचे दोन्ही डोळे अस्वलाने निकामी केले़

जेंव्हा अस्वलाने शेख जाविदवर हल्ला केला तेव्हा त्याने प्रतिकार केल्यामुळे अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या जावीदने मोबाईलवरून मित्रांना फोन केला. त्याआधी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेख जाविद यास तात्काळ गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ तेथे डॉ़ आऱएस़ ढोले यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी तेलंगणाच्या आदिलाबाद येथे हलविले आहे़ या घटनेमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात शेख यांचा एक डोळा जागेवरच  निकामी झाला़ तर दुसराही डोळा उपचारादरम्यान निकामी झाला असल्याचे डॉ़ ढोले यांनी सांगितले़ 

पाच हजारांची मदतया घटनेची माहिती मिळताच वनपाल के़जी़ गायकवाड, आऱजी़ सोनकांबळे, एस़एम़ सांगळे, एस़बी़ संतवाले, संभाजी घोरबांड यांनी जखमीला पाच हजार रुपयांची तातडीची मदत केली़ वन्य प्राण्यांनी जंगला लगतच्या शेत शिवारात येऊन पिकांचे नुकसान चालवले आहे़ े वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़

जखमी अवस्थेत शेख जावीदने केला मित्रांना फोनअस्वलाने हल्ला चढविल्यानंतर शेख यांनी आरडाओरडा करीत अस्वलाचा प्रतिकार करून त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली़ यानंतर मोठ्या धाडसाने जखमी अवस्थेत मित्रांना फोन करून बोलावून घेतले़ च्त्याआधी कापूस वेचणी करणारे शेजारी धावून आले़, परंतु अस्वलाने केलेल्या हल्ल्यात शेख यास दोन्ही डोळे गमवावे लागले़

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेडforestजंगल