शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुखेडातील ४१ शाळा बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: June 2, 2014 01:04 IST

मुखेड : मुखेड तालुक्यातील जि़प़च्या ४१ शाळा व खाजगी २ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़

 मुखेड : शिक्षण विभागाने तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा युडायसमध्ये निर्धारित केल्याप्रमाणे चौकशीअंती बंद करून त्या शाळेतील विद्यार्थी १ कि़मी़ अंतरावर असलेल्या शाळेत समायोजन करण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे यांना सर्व शिक्षण अधिकार्‍यांना दिले असून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यामुळे मुखेड तालुक्यातील जि़प़च्या ४१ शाळा व खाजगी २ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ यामुळे जि़ प़ चे ८२ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत़ मुखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२६ प्राथमिक शाळा व ६ माध्यमिक शाळा आहेत़ यासाठी ७७४ प्राथमिक शिक्षक, ५२ प्राथमिक पदवीधर शिक्षक व ५४ पदोन्नत मुख्याध्यापक आहेत़ तालुक्यातील जि़ प़ च्या शाळेची सद्यस्थिती सर्वसाधारण असून २३२ पैकी १९१ शाळेतील विद्यार्थीसंख्या बर्‍यापैकी आहे़ तालुक्यात वाडी-तांड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून वाडी-तांड्यावरील लोक खरीप हंगाम संपल्यानंतर उदरनिर्वाहासाठी आठ महिन्याकरिता परप्रांतात स्थलांतर होत असतात़ तर तांड्यावरील बंजारा समाज उसतोडीच्या कामाला जातो़ हे लोक मोलमजुरीसाठी जात असताना आपल्या पाल्यांनाही सोबत घेवून जातो़ तर काही मजूर आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी खाजगी संस्थेत दाखल देवून त्याच खाजगी संस्थेच्या वसतिगृहात ठेवून स्थलांतरित होत असतात़ यामुळे वाडी-तांड्यावरील जि़प़ शाळेतील विद्यार्थीसंख्या घटत चालली आहे़ शासनाने स्थलांतरित कुटुंबाच्या पाल्यांची शिक्षणाची सोय व्हावी व सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी स्थलांतरित होणार्‍या कुटुुंबाच्या पाल्यांसाठी गाव, वाडी, तांड्यावर हंगामी वसतिगृहाची सुरुवात केली़ मुखेड तालुक्यात ६४ हंगामी वसतिगृहांना मान्यता दिली़ सर्व शिक्षा अभियानातंर्गत मोफत गणवेश व पुस्तक वाटप सुरू केले़ तरी पण वाडी-तांड्यावरील शाळेतील विद्यार्थी संख्या घटत चालली आहे़ तालुक्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ९ शाळा आहेत़ यात मानसिंगतांडा, देगावतांडा, भाटापूर (पक़ु़), मेघूतांडा, खुरानुरातांडा, तोंडारतांडा, रेखुतांडा, किसन तांडा असून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेले मुकुंदतांडा, दापका राजातांडा, यशवंतनगर, पळसवाडी, मांजरीतांडा, खोबातांडा, निमजगा तांडा, सोनपेठ वाडी, जयसू तांडा, होनानाईकतांडा,प्रभूतांडा, हरीचंद्रतांडा, तुपदाळ (बु़), उंद्रीतांडा, वाल्मिक वाडी, देवला तांडा, सकनूरतांडा, रामचंद्रतांडा, चिचणापल्ली तांडा, आंदेगाव वाडी, भासवाडी, रूपचंदतांडा, कासारवाडी, सीताराम नाईकतांडा, संगमवाडी, गवळेवाडी, गोपनरवाडी, कमलातांडा, सोनपेठवाडी तांडा, वसूरतांडा, वाधावारतांडा, सोसायटीतांडा आदी ४१ वाडी- तांड्यावरील जि़प़च्या कमी पटसंख्येमुळे बंद होणार असून मुक्रमाबाद येथील परिवर्तन विकास मूकबधीर हायस्कूल व चांडोळा येथील शिवाजी महाराज विद्यालय बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने नुकतेच दिले आहेत़ १६ ते २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वाडी- तांड्यांवरील शाळेची भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेवून त्या वाडीतांड्यांवरील परिसरात किती अंतरावर दुसरी शाळा आहे़ तसेच येथील शाळेवर भौतिक सुविधाबाबत सद्य:स्थितीत तेथे शाळेची आवश्यकता आहे का, सर्वेक्षणामुळे सदर शाळेची पटसंख्या वाढण्याची शक्यता जाणवते काय, या सर्व बाबींची आरटीई अ‍ॅक्ट २००९ नुसार चौकशी करण्यात येईल़ उपरोक्त बाबी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह दोन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे व तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळेत वरील बाबी निश्चित नसल्यास प्रस्तुत शाळेचे १ ते ३ कि़मी़ अंतरावरील शाळेत विद्यार्थ्याचे समायोजन करता येते का, याबाबत चाचपणी सुरु आहे़ (वार्ताहर) याबाबत गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, याबाबतचे पत्र प्राप्त झाले असून १० पेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करणार असून २० पेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळांची पटसंख्या वाढते का याचा सर्वे करून पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार असून शक्य न झाल्यास त्याही शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना परिसरातील १ ते ३ कि़मी़ अंतरावरील शाळेत समायोजन करणार असल्याचे सांगितले़