शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

सात लाख रुपये चोरी करणाऱ्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:35 AM

एका कंपनीतील व्यवस्थापकाच्या आलमारीतून ७ लाख रुपये चोरून रेल्वेने जात असलेल्या तरुणास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांची कामगिरी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एका कंपनीतील व्यवस्थापकाच्या आलमारीतून ७ लाख रुपये चोरून रेल्वेने जात असलेल्या तरुणास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. त्याच्या जवळून ५ लाख ९० हजार ८२० रुपये आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला.दिनेशकुमार गुलाबराम चौधरी (२०) रा. कटघोरी, कोरबा, छत्तीसगड असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. तो हैदराबाद येथील गोविंद अग्रवाल यांच्या आनंद फूड्स कंपनीत बिस्कीट बनविण्याचे काम करीत होता. त्याच कंपनीत त्याचा भाऊ कामाला आहे. कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा असल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापकाने ७ लाख रुपये ड्रॉवरमध्ये ठेवले होते. संधी मिळताच आरोपी दिनेशकुमारने सात लाख रुपये चोरून पळ काढला. या घटनेची तक्रार साहिदाबाद, आंध्र प्रदेश येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली. आरोपी हैदराबादहून वारंगल आणि वारंगलहून वर्धेला आला. वर्धेवरून तो पुढे गावाकडे जात असताना लोहमार्ग पोलिसांनी त्याला गजाआड केले. लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी पथक तयार केले. त्यात सहायक पोलीस निरीक्षक चौधरी, हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, विनोद खोब्रागडे यांचा समावेश करण्यात आला. पथकाने रेल्वेगाड्यांची तपासणी केली. वर्धा रेल्वेस्थानकावर त्यांना आरोपी आढळला. आरोपीला साहिदाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :theftचोरीrailwayरेल्वेPoliceपोलिसArrestअटक