शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लढ्यात पुरुषांपेक्षा स्त्रिया सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

-महिला दीन विशेष सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. ‘कोविड-१९’ विषाणू लिंगभेद करीत नाही असे म्हटले ...

-महिला दीन विशेष

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. ‘कोविड-१९’ विषाणू लिंगभेद करीत नाही असे म्हटले जात असले तरी, आतापर्यंत कोरोनाबाधितांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची संख्या मोठी आहे. याचा परिणाम त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर व आर्थिक स्थैर्यावरही झाला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१पर्यंत कोरोनामुळे ३५२६ रुग्णांचे मृत्यू झाले. यात २४८० (७०.३३ टक्के) पुरुष, तर १०४६ (२९.६७ टक्के) महिला आहेत. महिलांच्या तुलनेत दुप्पट पुरुष मरण पावले आहेत. यामागे विविध वैद्यकीय कारणे दिली जात असली तरी पुरुषांच्या तुलनेत महिलांची आक्रमक रोगप्रतिकारशक्ती, योग्य पद्धतीची जीवनशैली, स्वच्छतेची काळजी व कमी व्यसनाधीन हे प्रमाण दिले जात आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा वेग वाढला आहे. आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ६ मार्चपर्यंत रुग्णांची संख्या १५६४५८ झाली आहे. यात जवळपास ६० टक्के पुरुष, तर ४० टक्के महिलांचे प्रमाण आहे. महिलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे आणि त्यातून मृत्यू होण्याचे प्रमाणही अगदी कमी आहे. या मागील कारण स्पष्ट करताना संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती २० टक्क्याने जास्त असते. हे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून सामोर आले आहे. जनुकीय कारणांमुळे महिलांचा ‘इम्युनिटी रिस्पॉन्स’ पुरुषांपेक्षा वेगळा असतो. परिणामी, महिलांना विषाणूंचा धोका कमी राहतो. ज्या महिलांना कोरोना होतो त्यांच्यामध्ये आजाराची गंभीरता व गुंतागुंत कमी दिसून येते. महिला औषधोपचाराला चांगला प्रतिसाद देतात. परिणामी, त्या लवकर बरे होतात.

-घराबाहेर कमी पडणे, स्वच्छतेच्या सवयी

डॉ. शिंदे म्हणाले, आतापर्यंतच्या पाहणीत असे आढळून आले की, घरात प्रथम पुरुषाला कोरोनाची लागण होते, नंतर त्याच्याकडून महिलांना होते. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये फार कमी महिला घराबाहेर पडल्या. शिवाय, काही काम असेल तरच त्या घराबाहेर पडतात. इतरांशी संपर्क कमी राहत असल्याने त्यांना संसर्गाचा धोका कमी राहतो. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक स्वच्छतेची काळजी घेतात, हेही एक कारण कोरोनाला दूर ठेवण्याचे आहे.

-जीवनशैली व व्यसनाधीनतेचे कमी प्रमाण

स्त्रियांमध्ये कोरोनाचा कमी धोका असल्याचे एक कारण म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत महिलांची जीवनशैली अधिक निरोगी असते. त्या आहाराकडे विशेष लक्ष देतात. घर आणि बाहेरील कामात सतत व्यस्त असतात. शिवाय महिलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी असते. पुरुषांपेक्षा महिला खूप कमी ध्रूमपान करतात. परिणामी, श्वसन, हृदयविकार व कॅन्सरचा धोका कमी राहतो. आतापर्यंत झालेल्या कोरोनाचा मृत्यूमध्ये ५० वर्षांवरील पुरुषांमध्ये गंभीर आजार हे मुख्य कारण ठरले आहे.

-महिलांच्या आर्थिक स्थैर्यावर प्रभाव

कोरोनाचा फटका महिलांपेक्षा पुरुषांना जास्त बसत असला तरी यातून आलेल्या मंदीची झळ महिलांना अधिक बसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य, शिक्षण, लघुउद्योग, घरकाम करणाऱ्या अनेक महिलांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. महिलांच्या आर्थिक स्थैर्यावर याच मोठा प्रभाव पडला आहे.

-निर्धास्त होण्याचे कारण नाही

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती अधिक सरस असल्याचे सिद्ध झाले आहे, पण कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. म्हणून निर्धास्त होण्याचे कारण नाहीच. महिलांनी ही प्रतिकारशक्ती नियमित व्यायामातून, योग्य आहारातून आणि सतत आनंदित राहण्याच्या प्रयत्नातून टिकवणे आणि वाढविणे गरजेचे आहे.

-डॉ. नितीन शिंदे

संसर्गजन्य आजार विशेषज्ञ