शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार देईल का ‘टू मिनीट’?

By admin | Updated: June 5, 2015 02:29 IST

‘बस टू मिनीट’ ही कॅचलाईन घेऊन घराघरात पोहचलेल्या मॅगीच्या दर्जावरून देशभरात रान उठविले जात आहे.

नागपूर : ‘बस टू मिनीट’ ही कॅचलाईन घेऊन घराघरात पोहचलेल्या मॅगीच्या दर्जावरून देशभरात रान उठविले जात आहे. मात्र, दररोज लाखो विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या दर्जाकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मॅगी हे बहुतेक उच्च व मध्यमवर्गीयांचे खाद्य असल्यामुळे आज देशभरात त्याची चर्चा होत आहे. परंतु शालेय पोषण आहारांच्या निकृष्ट दर्जा बाबत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या तक्रारीकडेही सरकार तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणार का, या आहाराच्या चौकशीसाठी सरकार ‘टू मिनीट’ देणार का,असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक ते पाच वर्गाच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व सहा ते आठ वर्गाच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. एक ते पाचपर्यंत आहाराचे प्रमाण प्रति विद्यार्थी तांदळाचे वाटप १०० ग्रॅम, यात कॅलरी ४५० व प्रथिने १२ ग्रॅम असते. त्याचबरोबर आहार खर्च ३.५० रुपये मिळतो. माध्यमिकसाठी प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम तांदूळ, कॅलरी ७००, प्रथिने २० ग्रॅम व आहार खर्च ५.२० पैसे मिळतो. शाळांमध्ये होणारा अन्नधान्य पुरवठा दि. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. येथून होतो. एफसीआय गोदामातून तांदळाची उचल करून, पुरवठादारामार्फत शाळांना पुरवठा केला जातो. शाळांना अन्न शिजवून देणे, इंधन व भाजीपाला याकरिता स्वतंत्र अनुदान दिले जाते. शहरी भागातील शाळांना केवळ तांदळाचा पुरवठा होतो. अन्न शिजवून देणे, इंधन, भाजीपाला यासाठी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील शाळांना पुरवठादाराकडून तांदुळ, तुरदाळ, चना, वाटाणा, सोयाबीन तेल, कांदा, लसूण, मसाला, हळद, मीठ, जीरे, मोहरी साहित्य पुरविले जातात. सरकार शालेय पोषण आहारावर कोट्यवधी खर्च केल्यावरही विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार मिळत नाही. शाळांना होणाऱ्या तांदळाचा पुरवठा हा निकृष्ट दर्जाचा असतो. त्यात अळ्या, जाळे लागलेले असतात. चना, वाटाण्याला भिरड लागलेली असते, टोचलेले असतात. सोयाबीनचे तेल व इतरही साहित्य लोकल कंपनीचे असते. त्यामुळे त्याच्या पौष्टिकतेवर प्रश्नचिन्हच आहे. अन्नधान्याबरोबर शाळांमध्ये आहार निर्माण करण्याच्या प्रक्रियेचाही आहाराच्या पौष्टिकतेवर परिणाम होतो. प्रयोगशाळेत तपासणीचा दावा नागपूर जिल्ह्यात २८३३ शाळेतील ३,९४,५६३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. यासाठी पुरविण्यात येणारे अन्नधान्य फेडरेशनच्या लॅबमध्ये प्रमाणित करण्यात येते. न्यूट्रीशन एक्स्पर्टकडून अन्नाच्या कॅलरी ठरविल्या जातात. जे साहित्य शाळेत येते त्याची तपासणी करण्यात येते. गेल्या वर्षभरात तरी, अशा कुठल्याही तक्रारी आल्या नाही. कुठल्याही विद्यार्थ्याला अन्नातून विषबाधा झाली नाही, असा दावा शालेय पोषण आहारचे अधीक्षक निलेश वाघमारे यांनी केला आहे.