शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 

By कमलेश वानखेडे | Updated: September 19, 2024 21:36 IST

खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. 

नागपूर : राज्यात नामांकित कंपन्या येत आहेत. दोन वर्षांच्या कारकीर्दीत पाच लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.  स्टील इंडस्ट्री, सोलारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधी पक्षाला आता दुसरे काही काम नाही. खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी सायंकाळी नागपुरात आगमन झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अनेक प्रकल्प आपण पूर्ण केले. राज्यासाठी सगळे ‘पॉझिटिव्ह’ सुरू असताना विरोधक उद्योग गेल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत.  लोकसभा निवडणुकीत असेच खोटं बोलून त्यांनी मत घेतली.  लाडकी बहिण योजनेच्या विरोधात कोर्टात गेले आहेत. काँग्रेस नेते सुनील केदार लाडकी बहिणी योजना बंद करण्याचे म्हणत आहेत. विरोधकांच्या पोटात दुखतेय, पायाखालची वाळू सरकली पण जनता त्यांना माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. 

राहुल गांधी हे विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात. आरक्षण रद्द करू, असे पंडित नेहरूंपासून तर अनेक काँग्रेस नेते बोलले आहेत. आज काँग्रेस नेते जे आंदोलन करत आहेत ते त्यांनी राहुल गांधी यांच्या  घरासमोर करायला हवे. आरक्षण कोणी हटवू शकत नाही. संविधान कोणी बदलू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी