शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

पेंचचा जलस्तर खालावला

By admin | Updated: January 6, 2015 01:01 IST

पारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला

पाणीटंचाईचे संकेत : पाण्याच्या पातळीत आठवडाभरात २ मीटरने घटचंद्रशेखर गिरडकर - पारशिवनीपारशिवनी तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्पातील पाणीसाठा मागील आठवड्याच्या तुलनेत २ मीटरने घटल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या प्रकल्पातून नागपूर व भंडारा शहराला पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. ऐन हिवाळ्यात जलसाठा घटल्याने उन्हाळ्यात या शहरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता सध्या तरी निर्माण झाली आहे. पेंच प्रकल्पातील जलसाठ्याची प्रत्येक आठवड्यात तपासणी केली जाते. या प्रकल्पात पावसाळा संपल्यानंतर १६ मीटर जलसाठा उपलब्ध होता. मागच्या आठवड्यातील पाहणीत हा जलसाठा १७ मीटर असल्याचे आढळून आले होते. चालू आठवड्यात हा जलसाठा २ मीटरने घटला असून, तो १४ मीटर शिल्लक असल्याचे आढळून आले.पेंच प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीची लांबी २०११ मीटर असून, सांडव्याची २३६४ मीटर व उंची ४४.५० मीटर आहे. या प्रकल्पाचा डावा कालवा मौदा तालुक्यातून भंडारा जिल्ह्यात गेला असून, हा कालवा ४८.५० कि.मी. लांब आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची व्याप्ती ही ३८८ वर्गमीटर आहे. उजवा कालवा कोराडीला आला असून, या कालव्याची लांबी ३२.८५ कि.मी. आहे. डाव्या कालव्यातून ९० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत असून, उजव्या कालव्यातून प्रति सेकंद १८.४ घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो. उजव्या कालव्याद्वारे कोराडी औष्णिक वीज प्रकल्प खापरखेड्यातील वीज प्रकल्प आणि नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नरसिंहराव उपसा जलसिंचन योजना व सत्रापूर जलसिंचन योजनेलाही या प्रकल्पातील पाणी दिले जाते. सध्या नागपूर महानगरपालिकेच्या पेंच टप्पा-४ चे काम सुरू असून, ते लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पात दरवर्षी जून महिन्यापर्यंत जलसाठा कायम राहावा, यासाठी नागपूर व मध्य प्रदेशातील जबलपूरचे जिल्हाधिकारी या प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करतात. या नियोजनांतर्गत दरवर्षी या प्रकल्पातील पाणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील रबीच्या पिकांसाठी (सिंचन) तीन ते चारवेळा पाणी सोडले जाते. पाण्याचा घटता स्तर तसेच मे व जून महिन्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता, केवळ दोनवेळा सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.