शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांकडून रेमडेसिवीरचा अनियंत्रित वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST

राहुल लखपती नागपूर : नागपूर शहरात काेराेना संसर्गाची झपाट्याने वाढ हाेत असून, सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पाच शहरांत नागपूरचाही क्रमांक ...

राहुल लखपती

नागपूर : नागपूर शहरात काेराेना संसर्गाची झपाट्याने वाढ हाेत असून, सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पाच शहरांत नागपूरचाही क्रमांक लागत आहे. दरराेज पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा नवा उच्चांक गाठत असून, मृत्यूची संख्याही वाढत आहे. रुग्णालयांमध्ये निर्माण झालेल्या बेड्सचा तुटवडा नागरिकांच्या भीतीचे कारण ठरला असून, आपल्या प्रियजनांना वाचविण्यासाठी अक्षरश: नातेवाइकांची धावपळ हाेत आहे. हा सर्व संभ्रम व गाेंधळाच्या परिस्थितीत डाॅक्टर्स व रुग्णालयांद्वारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनियंत्रितपणे वापर केला जात आहे. केवळ बिल वाढविण्यासाठी ज्या रुग्णांना गरज नाही अशांनाही इंजेक्शन दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समाेर येत आहे.

ओपीडीमध्ये सीटी स्कॅनद्वारे केलेल्या तपासणीत साैम्य लक्षणात गणल्या जाणाऱ्या ५ ते ६ टक्के संसर्गाचे प्रमाण असलेल्या रुग्णांनाही रेमडेसिवीरचे इंजेक्शन लावले जाते. या प्रकारामुळे शहरात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असून, अशामुळे खराेखर गरज असलेल्या रुग्णांना इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

प्रकाशात येत आहे धक्कादायक सत्यता

रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या औषधी कंपन्या इंजेक्शनसाठी वेगवेगळ्या किमती आकारत आहेत. रुग्णालयांना १००० ते १५०० रुपये किमतीमध्ये ते वितरित केले जात आहे. मात्र, खासगी रुग्णालये व डाॅक्टर्स त्यासाठी रुग्णांकडून ५००० रुपयांपर्यंत शुल्क आकारत आहेत. इंजेक्शनच्या कव्हरवर एवढीच किंमत अंकित असून, त्याचाच फायदा रुग्णालये घेत आहेत. रुग्णालयात भरती नसलेल्या साैम्य लक्षणांच्या रुग्णांनाही रेमडेसिवीर दिले जाते आणि शुल्क वसूल केले जात आहे. असे असले तरी सत्य हे आहे की, कितीही आर्थिक भार आला असला तरी काेराेनाच्या भीतीमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांना माेठी किंमत चुकवावीच लागत आहे. महामारीच्या याच परिस्थितीचा अशाप्रकारे फायदा लाटण्यात येत आहे.

६० हजार रुपये बिल ठरलेलेच

काेराेनाच्या रुग्णांना १०० मिलिग्रॅम इंजेक्शनचे कमीत कमी सहा डाेस दिले जातात. प्रत्येक इंजेक्शनचे ५००० रुपये आणि डाेस देणाऱ्या डाॅक्टरचेही शुल्क तेवढेच. याचा अर्थ रुग्णाला रेमडेसिवीरच्या पूर्ण डाेससाठी ६०,००० रुपये बिल निघणे निश्चितच आहे. विशेष म्हणजे कव्हरवर ९९५ रुपये खरी एमआरपी अंकित असलेल्या झायडस कॅडिला कंपनीच्या ‘रेमडॅक’ इंजेक्शनला डाॅक्टर व रुग्णालयांद्वारे नकार दिला जाताे.

कंपन्यांनी इंजेक्शनच्या किमती सारख्या ठेवाव्यात

इंडियन मेडिकल असाेसिएशन, नागपूरच्या अध्यक्ष डाॅ. अर्चना काेठारी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना अशाप्रकारची माहिती आतापर्यंत आपणापर्यंत आली नसल्याचे म्हटले आहे. हे सत्य असेल तर सर्व औषध कंपन्यांनी इंजेक्शनसाठी सारख्या किमती आकारणे आवश्यक आहे. सरकारने मास्क, सॅनिटायझर, तपासण्या व औषधाेपचाराचा खर्च निर्धारित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारनेच लक्ष घालायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा ‘लाेकमत’शी बाेलताना म्हणाले, औषधांच्या किमती अन्न व औषधी प्रशासनाद्वारे नियंत्रित केल्या जातात. आमच्यापर्यंत अशाप्रकारची सामूहिक किंवा वैयक्तिक तक्रार प्राप्त झालेली नाही. आमच्यापर्यंत तक्रार आली तर केसप्रमाणे तपास करून ॲक्शन घेतली जाईल, असा भरवसा त्यांनी दिला. मात्र, अशाप्रकारच्या गैरप्रकाराबाबत संबंधित प्रशासनाशी चर्चा करू. गरज नसताना रेमडेसिवीर दिलेल्या रुग्णाने तक्रार केल्यास या प्रकरणात नक्कीच लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औषध कंपनीचे नाव अंकित एमआरपी

सिप्ला सिप्रेमी ४०००

मायलान डिसरेम ४८००

हिटेराे हेल्थकेअर काेव्हिफाॅर ५४००

जुबिलंट जेनेरिक्स जुबी-आर ४७००

झायडस कॅडिला रेमडॅक ९९५