शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१८ जखमी सैनिकांवर नागपुरात उपचार

By admin | Updated: May 5, 2017 02:49 IST

गडचिरोलीतील भामरागडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या १८ सैनिकांना गुरुवारी नागपुरातील...

दोघांची प्रकृती गंभीर : चार सैनिकांवर तातडीची शस्त्रक्रिया नागपूर : गडचिरोलीतील भामरागडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या १८ सैनिकांना गुरुवारी नागपुरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. यातील चार सैनिकांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रात्री उशिरा राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या रुग्णालयाला भेट देत सैनिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ‘सी-६०’ कमांडोंचे पथक गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली. ही गाडी २० ते २५ फूट उंच उडून सैनिकांच्या अंगावर पडल्याने ३९ सैनिक जखमी झाले. यातील नामदेव भोगामे (२५), अतुल पवार (२५), प्रकाश कन्नाके (३०), हिदायत खान (२५) व दीपक भांडवलकर या पाच गंभीर सैनिकांना सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरच्या मदतीने नागपुरात आणून ‘क्युअर इट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. चार सैनिकांवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दीपक भांडवलकर या सैनिकाचे मूत्राशय फाटले असून, शरीरावर गंभीर जखमा आहेत. त्याला आॅक्सिजनवर ठेवण्यात आल्याचे इस्पितळाच्यावतीने सांगण्यात आले. उर्वरित १३ जखमी सैनिकांना टप्प्याटप्प्याने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत रुग्णालयात आणण्यात आले. यातील सर्व सैनिकांची प्रकृती स्थिर आहे. येथील डॉक्टरांनी सांगितले, स्फोट इतका भीषण होता की सैनिकांचे वाहन २० ते २५ फूट उंच उडून अंगावर पडले. यामुळे बहुतांश सैनिकांमध्ये हातापायाच्या फ्रॅक्चरसोबतच इतरही ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या आहेत. सूत्रानुसार, डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या चमूने सैनिक दाखल करण्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये रक्ताचा साठा उपलब्ध करून दिला. यातील नऊ रक्तपिशव्या लागल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी) भ्याड हल्ल्याचे उत्तर दिले जाईल जखमी सैनिकांची पाहणी केल्यानंतर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, या भ्याड हल्ल्याचा पोलीस आपल्या पद्धतीने उत्तर देतील. गस्त घालणाऱ्या सैनिकांची सुरक्षा प्रणालीही तपासून घेतली जाईल. जखमी सैनिकांची प्रकृती स्थिर असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल उपस्थित होते.