शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत १३० किलोमीटर वेगाने धावणार रेल्वे गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नागपूर : इटारसी-बल्लारशाह सेक्शनची क्षमता वाढविण्यात येत आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांची परवानगी मिळताच या सेक्शनमध्ये आगामी पाच ...

नागपूर : इटारसी-बल्लारशाह सेक्शनची क्षमता वाढविण्यात येत आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांची परवानगी मिळताच या सेक्शनमध्ये आगामी पाच महिन्यांत रेल्वे गाड्या प्रतितास १३० किलोमीटर वेगाने चालविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी नागपूर विभागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले, इटारसी-बल्लारशाह सेक्शनमध्ये १३० किलोमीटर वेगाने रेल्वे गाड्या चालविण्यासाठी चाचणी सुरू आहे. त्यानंतर नागपूर-वर्धा, नागपूर-बल्लारशाह सेक्शनमध्येही चाचणी घेण्यात येणार आहे. आरडीएसओच्या (रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) वतीने चाचणी घेण्यात येत आहे. आरडीएसओ आपला अहवाल देईल. अहवालात काही सुधारणा सुचविल्यास संबंधित कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी यांना इटारसी ते बल्लारशाह ट्रायल घेण्यासाठी अर्ज करण्यात येईल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास इटारसी-बल्लारशाह सेक्शनमध्ये पाच महिन्यांत रेल्वे गाड्या १३० किलोमीटर वेगाने धावू शकतील, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सुविधेसाठी समर्पित भावनेने कार्य केले. विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालवून १.१४ लाख टन औषधांसह जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. ६०० श्रमिक स्पेशल गाड्या चालवून श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आले. लॉकडाऊनमध्ये ६८ किलोमीटर रेल्वे रुळाचे दुहेरीकरण करण्यात आले. २७५ किलोमीटर रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात मालगाड्यांचा वेग २४ किलोमीटरवरून ४२ किलोमीटर प्रतितास करण्यात आला. रेल्वेस्थानकावर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. बल्लारशाह, चंद्रपूर, माजरी, वरोरा येथील स्थानकांची पाहणी केली असता तेथील कर्मचारी चांगले काम करीत आहेत. नागपूर विभागात प्रवाशांना तसेच दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

..........

थर्ड, फोर्थ लाइनचे काम प्रगतिपथावर

नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती महाव्यवस्थापकांंनी दिली. सिंधी ते बुटीबोरीदरम्यान २० किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे. उर्वरित कामासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

..........