शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात   तीन तलाक दिल्यामुळे गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:51 IST

पत्नीला पोस्टकार्ड पाठवून तीन तलाक देणाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन तलाकचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर हे शहरातील पहिले प्रकरण आहे.

ठळक मुद्देस्पीड पोस्टने दिली सूचना : कायदा लागू झाल्यानंतरची पहिली घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पत्नीला पोस्टकार्ड पाठवून तीन तलाक देणाऱ्याविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन तलाकचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर हे शहरातील पहिले प्रकरण आहे.अशर मोबीन मदनी असे आरोपीचे नाव आहे. तो प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. त्याचा ऑक्टोबर २०१३ मध्ये कुदसियाशी निकाह झाला होता. कुदसियाला चार आणि दोन वर्षांची मुलगी आहे. कुदसियाने दिलेल्या माहितीनुसार तिच्या पतीला दारू, मादक पदार्थ आणि इतर वाईट सवयी आहेत. त्यामुळे अशर तिला यातना देत होता. तिच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर यातनात आणखीनच वाढ झाली. तो मुलाला जन्म दिला नसल्यामुळे नेहमीच टोमणे मारत होता. मे २०१८ मध्ये अशर तिला सोडून निघून गेला. तो आपल्या आईसोबत वेगळा राहू लागला. कुदसिया आपल्या मुली आणि आजीसोबत राऊत ले-आऊटमध्ये राहु लागली. २९ जूनला अशरफने स्पीड पोस्टने कुदसियाला तीन तलाक पाठविली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुदसियाला स्पीड पोस्ट प्राप्त झाले. ते वाचून कुदसिया अवाक् झाली. तणावात असल्यामुळे तिने तक्रारही दाखल केली नाही. कुटुंबीयांना अशरने तलाक दिल्याचे सांगितले. त्यानंतर मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुदसियाच्या तक्रारीच्या आधारावर अशरला नोटीस जारी केली. अशरने कुदसियाला तीन तलाक दिल्याचे कबूल केले होते. त्या आधारावर मंगळवारी मानकापूर पोलिसांनी अशरच्या विरुद्ध मुस्लिम विवाह अधिकार संरक्षण कायदा २०१९ च्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जुलै महिन्यात तीन तलाकचे बिल पास झाले. त्यानुसार मुस्लिम समाजात पतीद्वारा पत्नीला तीन तलाक देणे गुन्हा आहे. हा कायदा १ ऑगस्टपासून लागू झाला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर शहरातील हे पहिले प्रकरण आहे. पोलिसांनी अशरला अटक केली नाही.घरामुळे वादकुदसिया अशरला त्याच्या आईकडून भेट मिळालेल्या बंगल्यात राहते. या बंगल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू आहे. अशरने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयाविरुद्ध घरावर ताबा मिळविल्याचा गुन्हा दाखल केला होता. परंतु कुदसिया अशरने घराची रजिस्ट्री तिच्या नावावर केल्याचा दावा करीत आहे. मानकापूरचे ठाणेदार वजीर शेख यांनी सांगितले की, कुदसियाने दिलेली तक्रार खरी असून त्या आधारे तीन तलाकचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन तलाक आणि संपत्तीचा वाद वेगवेगळा आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकnagpurनागपूर