यंदा विधानभवनातील अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 18:08 IST2025-12-07T18:07:01+5:302025-12-07T18:08:07+5:30

 सभापती-उपसभापतींनी घेतला अधिवेशन व्यवस्थेचा आढावा 

This year, unnecessary crowding in the Vidhan Bhavan will be avoided, winter session will start from today, administration is ready | यंदा विधानभवनातील अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज

यंदा विधानभवनातील अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज


नागपूर :  हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात (विधानभवनात) होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यात आली आहे. याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. 

 प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, हिवाळी अधिवेशनाबाबतच्या तयारीचा सकाळी आढावा घेण्यात आला. त्यावेळी अनावश्यक गर्दी टाळण्याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहे.त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पाव्व्यक्तीने प्रवेश केला असेल तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 विधान भवनाच्या मंत्री परिषद सभागृहात प्रा. शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन कालावधीमध्ये मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य व अन्य मान्यवरांसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था, पुरविण्यात आलेली इंटरनेट-वायफाय सुविधा, सुरक्षा, आरोग्य आदी सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमध्ये देण्यात आलेल्या वायफाय व इंटरनेट व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली. महिला आमदारांची निवास व्यवस्था, राजकीय पक्षांच्या प्रतोदांना कार्यालये उपलब्ध करून देणे आणि या सर्व ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा, लिफ्ट, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छता आदिंविषयी निर्देशही देण्यात आले.

या बैठकीला विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव १), मेघना तळेकर (सचिव-२), डॉ. विलास आठवले (सचिव-३) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-४) यांच्यासह विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.बैठकीनंतर सभापती व उपसभापती यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची व परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.

- विमानांची गैरसोय, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती 
सध्या विमानांची गैरसोय आहे. अधिवेशनासाठी कोणत्याही सदस्यांना उशीर होऊ नये, त्यांची गैरसोय होऊन नये ते वेळेवर पोहोचावे यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. यासोबतच परत जाताना सुद्धा १४ तारखेला रात्री आणि १५ तारखेला विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची सूचना रेल्वे विभागाला करण्यात आली होती. ती रेल्वेने मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title : शीतकालीन सत्र: विधान भवन में अनावश्यक भीड़ से बचाव, प्रशासन तैयार

Web Summary : विधान भवन शीतकालीन सत्र में अनावश्यक भीड़ कम करेगा। वीआईपी पास अलग रंग के होंगे। प्रशासन ने सदस्यों के लिए आवास, इंटरनेट, सुरक्षा जैसी सुविधाओं की समीक्षा की। उड़ान में देरी के लिए नोडल अधिकारी नियुक्त; विशेष ट्रेनें व्यवस्थित।

Web Title : Winter Session: Vidhan Bhavan to Avoid Unnecessary Crowds, Administration Ready

Web Summary : Vidhan Bhavan to limit winter session crowds. VIP passes will have different colors. Administration reviewed facilities like accommodation, internet, security for members. Nodal officer appointed for flight delays; special trains arranged.