शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसंमेलनातून काहीच मिळत नाही! मी जाणेही टाळतो! ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:52 IST

नाट्यसंमेलनांमध्ये केवळ नाटके होतात काहीच निष्पन्न होत... असे माझे मत आहे. मला तर काहीच मिळाले नाही आणि त्यामुळेच, मी जाणेही टाळतो. किंबहुना, मी नाट्यसंमेलनाला जातच नाही.. असे परखड मत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे आम्हीही रटाळ विनोद केले, मात्र अप्रासंगिक नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाट्यसंमेलनांमध्ये केवळ नाटके होतात आणि ज्याला मनोरंजन हवे असेल त्याला मनोरंजन मिळते. बाकी काही मिळत नाही, काहीच निष्पन्न होत... असे माझे मत आहे. मला तर काहीच मिळाले नाही आणि त्यामुळेच, मी जाणेही टाळतो. किंबहुना, मी नाट्यसंमेलनाला जातच नाही.. असे परखड मत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले. यावेळी, प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत व सिद्धीविनायक पब्लिसिटीचे प्रमुख समीर पंडित उपस्थित होते.अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे घेतली जाणारी नाट्यसंमेलनांमध्ये कुठल्या चर्चा घडताना मला तरी आढळत नाहीत. आणि चर्चा घडल्या तरी त्यातून अपेक्षित सुधारणा किंवा हवे असलेले परिवर्तन घडले... असेही मला कधी दिसले नाही. मी एकदा एका नाट्यसंमेलनाला गेला. त्यानंतर, पुन्हा कधी माझी इच्छा झाली नाही.. असे अशोक सराफ पत्रकारांशी बोलताना सांगत होते. विनोदी भूमिका आणि विनोदनिर्मिती... याबद्दल वर्तमान आणि भूतकाळात कोणता फरक जाणवतो, असा सवाल उपस्थित केल्यावर त्यांनी.. वर्तमानातील विनोदबुद्धीवर थेट प्रहार करत, प्रेक्षक हसत नाहीत. केवळ आग्रहाने हसविले जात असल्याचे स्पष्ट केले. आमच्या काळातील चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका आणि विनोद निर्मितींचा बाज वेगळा होता. प्रेक्षक विचार करून हसत होते किंवा हसून विचार करत होते. आता, तसे कुठे दिसते... असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्याही काळात विनोदात रटाळता होती.. हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे, एकसुरीपणा निर्माण झाला होता आणि त्याच त्या भूमिका वठवाव्या लागत होत्या. मात्र, याला कोणी एक जबाबदारी नव्हता. तर, निर्मितीच्या क्षेत्रात असलेले लेखक, दिग्दर्शक आणि तेवढाच कलावंतही जबाबदार होता... अशी कबूलीही सराफ यांनी दिली. मी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आलो तेव्हा शाब्दिक आणि प्रासंगिक विनोद चालत होता. त्यात स्लॅप्स्टिक कॉमेडीची जोड देऊन, प्रासंगिक देहबोली जोडली. अपघातात सहा महिने बेडवर असल्याने, माझ्या वाट्याला आलेल्या सर्व भूमिका लक्ष्मीकांत बेर्डेकडे गेल्या आणि माझ्यासारखा विनोद करून त्याने स्वत:ला सिद्ध केले. मात्र, आमच्या काळात विक्षिप्तपणा नव्हता.. असे ते आवर्जुन सांगत होते.संमेलनाच्या आयोजनात प्रचंड परिश्रम असतात - निर्मिती सावंतनाट्यसंमेलनाच्या आयोजनांमध्ये स्थानिक कलावंतांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात आणि तेथे बाहुल्यांसारखे जाऊन आम्ही कलावंत मिरवित असतो. अशा संमेलनांमध्ये ज्यांना जे मिळत असेल, तो त्यांचा भाग. मात्र, त्यांच्यावर बोट ठेवून त्यांच्या परिश्रमाचा अपमान कशाला करायचा, असे निर्मिती सावंत यावेळी म्हणाल्या. यासोबतच, वेगवेगळ्या शहरांमध्ये खड्ड्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी प्रत्येकवेळी सरकारलाच जबाबदार धरण्यापेक्षा, नागरिक म्हणून आम्ही काय करतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ashok Sarafअशोक सराफ