शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 12:50 IST

नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली.

नागपूर : हिंदुत्व ही मूल्याधिष्ठित जीवनशैली आहे. भगवे झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणे किंवा काही कृती करणे हे हिंदुत्व नाही. आपण पूजेदरम्यानही विश्वकल्याणाची प्रार्थना करतो. अनेकतेतून एकता आणि सर्वधर्म समभाव हे भारतीयतेचे खरे रूप आहे, हेच हिंदुत्व आहे. मात्र, काँग्रेसने हिंदुत्वाचा अर्थ चुकीचा लावला, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

शनिवारी नागपुरातील प्रकट मुलाखतीत २०२९ मध्ये तुम्ही कुठल्या भूमिकेत असाल असे विचारले असता गडकरी यांनी ‘रिअल फिल्म अभी बाकी है’ असे व्यक्तव्य केले.  

नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली.

२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत विचारले असता गडकरी म्हणाले, ११ वर्षांत जे पाहायला मिळाले, ते केवळ एक न्यूज रील होते, खरी फिल्म अजून सुरू व्हायची आहे. पक्ष  जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गडकरी यांनी   विविध योजनांचा  आढावा घेतला.

विकास खूप, लोकसंख्या वाढत असल्याने दिसत नाही

विकासासोबत दरडोई उत्पन्न वाढले का, असा प्रश्न केला असता गडकरी म्हणाले, मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात चौफेर विकास झाला आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात जेवढा विकास झाला नाही तो या काळात झाला; परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना विकास दिसत नसल्याचे गडकरी म्हणाले.

बडगुजरबाबत मौन

सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, गडकरी म्हणाले, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. भाजप ही कार्यकर्त्यांची आणि विचारधारेची पक्षसंस्था आहे. मिळालेली लोकप्रियता कार्यकर्त्यांचे श्रेय आहे.   विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीHindutvaहिंदुत्वBJPभाजपा