शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

नवव्या माळ्यावरून उडी घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या; बुटीबोरी परिसरातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:05 IST

Nagpur : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मोबाइल 'अनलॉक' झाल्यानंतर त्याच्या आत्महत्येचे खरे कारण समजू शकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रेयस चंद्रकांत माने (२१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असून तो नागपुरातील बुटीबोरी परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. मंगळवारी श्रेयसची सेमिस्टर परीक्षा सुरू होणार होती. तो वसतिगृहात राहत होता. त्याच्या खोलीत एकूण ४ विद्यार्थी राहत होते. परंतु, श्रेयस मागील काही दिवसांपासून खोलीतील मित्रांशीदेखील काही बोलत नव्हता. अभ्यास झाला नसल्यामुळे तो तणावात होता, अशी माहिती त्याच्या खोलीतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

सोमवारी पहाटे ४ वाजेनंतर तो खोलीच्या बाहेर निघाला. त्यानंतर तो लिफ्टने नवव्या माळ्यावर गेला. तेथून त्याने उडी मोबाइल अनलॉक झाल्यानंतर कळेल कारण घेतली. यात जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने बुटीबोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बुटीबोरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ व न्याय वैद्यक विभागाला पाचारण केले.

श्रेयसने चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परंतु, त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांना विचारणा केली असता श्रेयसचा मोबाइल अनलॉक झाल्यानंतर आत्महत्येचे कारण समजू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Student commits suicide by jumping from ninth floor in Butibori.

Web Summary : A student in Butibori, Nagpur, jumped from his hostel's ninth floor, tragically ending his life. Police are investigating, hoping to unlock his phone to uncover the reason behind the suicide. He was reportedly stressed about upcoming exams.
टॅग्स :nagpurनागपूरStudentविद्यार्थी