शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

By नरेश डोंगरे | Updated: October 4, 2025 00:30 IST

'ड्यूटी मॉनिटरिंग सिस्टम'चा झाला फायदा

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: गुरुवारचा दिवस नागपूरच्या रेल्वे स्थानकासाठी विविध दृष्टीकोनातून ऐतिहासिक ठरला. अवघ्या २४ तासांत या रेल्वे स्थानकावर तब्बल अडीच ते पावणेतीन लाख प्रवासी आले. नजर जाईल तिकडे माणसंच माणसं. गर्दीत चोर-भामटे सक्रिय होतात अन् नंतर माणूसकी हरविते, असे म्हणतात. मात्र, गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत गर्दीचा महासागर उसळला असताना रेल्वे स्थानकावर माणूसकीचेही पदोपदी दर्शन झाले. खास करून वृद्ध, महिला आणि लहान मुलांना स्वयंस्फूर्त सेवेकऱ्यांनी खाण्या-पिण्याच्या पदार्थांसह उठण्या-बसण्यासाठी, जाण्यायेण्यासाठी केलेली मदत चिरंतर लक्षात राहिल, अशी होती.

हरवलेल्या व्यक्तींच्या, खास करून लहान मुलांच्या बाबतीतील सर्वच घटना संबंधित नातेवाईकांच्या काळजात धस्स करणाऱ्या होत्या. यापैकी तेलंगणातील 'बिछडलेल्या बाप-लेकाची' एक घटना फारच हृदयस्पर्शी ठरली.

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी पवित्र दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत भाविक येतात. गुरुवारीही अभूतपूर्व गर्दी होती. रेल्वे स्थानकाच्या सर्वच्या सर्व फलाटांवर, बाहेरच्या परिसरात आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये बाबांच्या अनुयायांची प्रचंड गर्दी होती. कोण, कोणत्या प्रांतातील, कोणत्या गावातील, ते माहिती नव्हतं. मात्र, प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीसाठी तत्पर दिसत होते. यातील अनेक वृद्ध दिवसभरात आपल्या नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तींपासून दुरावले. मात्र, माहिती मिळताच हरविलेल्या व्यक्तींना सेवाभावी व्यक्ती, रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी शोधून नातेवाईकांची भेट घालवून दिली. रात्री ९ च्या सुमारास मात्र एका ९ वर्षीय लहानग्याच्या हरविण्यामुळे त्याच्या कुटुंबियांसोबतच अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली होती.

हा मुन्ना तेलंगणातील रहिवासी होय. नातेवाईकांसोबत बुधवारी दीक्षाभूमीवर आला अन् गुरुवारी रात्री गावी परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहचला. गर्दीत त्याचा हात वडिलांच्या हातून सुटला अन् गहजब झाला. जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी मुन्ना मात्र दिसतच नव्हता. अर्धा-पाऊण तास शोधाशोध करूनही पत्ता लागला नाही. त्यामुळे रडवेल्या अवस्थेत वडिल अण्णा रेल्वे पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी माहिती देताच वरिष्ठ निरीक्षक गाैरव गावंडे यांनी लगेच शोधमोहिम सुरू केली.

'ड्यूटी मॉनिटरिंग सिस्टम'चा फायदा

रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी यावर्षी गर्दीतील माणसं शोधण्यासाठी प्रथमच रेल्वे स्थानकावर 'ड्यूटी मॉनिटरिंग सिस्टम' सुरू केली. त्यामुळे अडीच लाखांच्या गर्दीचा बंदोबस्त हाताळणारे १६५ पोलीस कर्मचारी प्रत्येक अधिकाऱ्याच्या मोबाईल अॅपवर दिसत होते. कोण कुठे आहे, तेथे नेमकी काय स्थिती आहे, ते कळत होते. या सिस्टममुळे एका क्षणातच हरविलेल्या मुन्नाचे वर्णन, फोटो गर्दीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या मोबाईलवर पोहचला अन् त्या आधारे अवघ्या १५ मिनिटात मुन्ना एका पोलिसाच्या नजरेस पडला.

भाषेची अडचण अन्...

या प्रकरणातील वैशिष्ट्य म्हणजे, मुन्नाला केवळ तेलगू भाषाच येत होती. दुसरी भाषा त्याला कळत नसल्याने त्याची मोठी अडचण झाली होती. दरम्यान, मुन्नाला रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बापाला मुलाने आणि मुलाला बापाने पाहिले अन् दोघेही एकमेकांना घट्ट बिलगले. ही गळाभेट आनंदाश्रूत चिंब झाली. नंतर भरल्या डोळ्यांनी पोलिसांचे आभार माणून मुन्ना आणि अण्णा आपल्या माणसांसोबत गावाकडे निघून गेले.

English
हिंदी सारांश
Web Title : Lost boy reunited with father in Nagpur station crowd.

Web Summary : Nagpur station saw heartwarming reunion. A boy, lost in the Dasara crowd, was quickly found using the 'Duty Monitoring System' and reunited with his relieved father, highlighting the police's efficiency and humanity amid chaos.
टॅग्स :nagpurनागपूर