शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार झाडांची कत्तल !

By admin | Updated: June 5, 2015 02:34 IST

उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे.

जीवन रामावत  नागपूर उपराजधानीतील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे. यात मागील पाच वर्षांत शहरातील सुमारे तीन हजार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्याचा शहरातील पर्यावरणावर फार मोठा वाईट परिणाम होऊ लागला आहे. विज्ञान व बुद्घिमत्तेच्या जोरावर प्रगतीची भरारी घेताना पर्यावरणाला दुय्यम ठरविले जात आहे. परंतु पर्यावरण हा जीवनाचा आधार आहे. त्यामुळे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने नवीन वृक्ष लावण्याची शपथ घेण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी हाच सर्वात सोपा मार्ग आहे. जैवविविधता मानवाला अन्न, पाणी व निवारा अशा जीवनावश्यक वस्तू पुरविते. जैवविविधतेचा नाश हा पर्यावरणीय परिसंस्थांची उत्पादकता कमी करतो. त्यामुळे जैवविविधतेचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्ष जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यासह विविध सजीवांच्या सुरक्षेसाठी आज वृक्षारोपण ही प्राथमिक गरज आहे. हिरव्यागार झाडांमुळे शहरात चैतन्य निर्माण होते.मात्र सध्याची जीवनशैली पर्यावरणाला बाधक ठरत आहे. उत्पादन व उपभोगाच्या पद्घतीमुळे पाणी, हवा व जमिनींचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भोगवादी व चंगळवादी जीवनशैलीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. मानवासह हवा, पाणी, माती, खडक, वनस्पती व प्राणी हे सर्व पर्यावरणाचे घटक आहेत. यात आपले शहर सुद्घा अंतर्भूत आहे. उपराजधानीत ७९.५८ एकर जागेत ४१ उद्याने विकसित केली आहेत. परंतु त्या उद्यानांची सुद्धा फार चांगली अवस्था नाही. नागपूर मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. येथून काहीच अंतरावर कन्हान व पेंच नदी असून, पश्चिमेला वर्धा व पूर्वेला वैनगंगा नदी आहे. पर्यावरणाचा विचार डोक्यात येताच प्रदूषणाचा प्रश्न पुढे उभा ठाकतो.या प्रदूषणाच्या प्रकोपात अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. शिवाय २८७ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तज्ज्ञांच्या मते, पशुपक्ष्यांचा निवास नष्ट झाल्यास त्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.