शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंद गोदामात आढळले शीर

By admin | Updated: January 3, 2017 02:39 IST

कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शीर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ

धड बेपत्ता, नरबळीची शंका : परिसरात खळबळ, पोलिसांची चुप्पी नागपूर : कोराडी नाक्याजवळच्या बंद गोदामात एक मानवी शीर लटकवून असल्याचे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे शीर वायरने (केबल) बांधून (लटकवून) आहे. तर, धड बेपत्ता आहे. शिराखाली काही हाडेही पडून आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू झाली आहे. कोराडी नाक्याजवळ हे गोदाम असून ते अनेक दिवसांपासून बंद असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी काही जण गोदामाजवळ गेले. त्यातील एकाने बंद गोदामाच्या खिडकीतून डोकावले असता त्याला मानवी शीर लटकलेले दिसले. त्यामुळे घाबरून हे सर्व जण चौकाकडे पळत आले. नंतर ही वार्ता कर्णोपकर्णी सर्वत्र पोहचली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृत कोण, मारले कसे ? ज्याचे शीर लटकवून ठेवण्यात आले, तो तरुण कोण आहे आणि त्याला मारणारे आरोपी कोण आहे, ते तूर्त अंधारात आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे, खूप दिवसांपासून बंद असलेल्या गोदामात आरोपी शिरले कसे, असाही प्रश्न आहे. त्यांनी मृताची हत्या तेथेच केली आणि धड तेथून पळवून नेले की आधी हत्या केली आणि गोदामात नरबळीसाठी केला जातो, तसा पूजाविधी केला की काय, त्याबाबत कोराडी पोलिसांकडे वारंवार विचारणा करूनही माहिती मिळाली नाही. रात्री ९ वाजेपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा आहे, असे पोलीस ठाण्यातून सांगितले जात होते.