नागपूरसह चार शहरांवर उद्यापासून तीव्र उष्ण लाटेचा धाेका; वेधशाळेने जारी केला येलाे अलर्ट

By निशांत वानखेडे | Updated: May 14, 2026 20:05 IST2026-05-14T20:04:43+5:302026-05-14T20:05:28+5:30

Nagpur : उन्हाळा सुरू झाल्यापासून उष्णतेच्या ‘रेड झाेन’मध्ये असलेल्या विदर्भातील चार शहरांना येत्या २४ तासानंतर तीव्र उष्ण लाटेचा सामना करावा लागू शकताे.

Severe heat wave threatens four cities including Nagpur from tomorrow; Observatory issues yellow alert | नागपूरसह चार शहरांवर उद्यापासून तीव्र उष्ण लाटेचा धाेका; वेधशाळेने जारी केला येलाे अलर्ट

Severe heat wave threatens four cities including Nagpur from tomorrow; Observatory issues yellow alert

नागपूर : उन्हाळा सुरू झाल्यापासून उष्णतेच्या ‘रेड झाेन’मध्ये असलेल्या विदर्भातील चार शहरांना येत्या २४ तासानंतर तीव्र उष्ण लाटेचा सामना करावा लागू शकताे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दाेन दिवसात सध्याच्या तापमानात पुन्हा २ ते ३ अंशाची वाढ हाेण्याची शक्यता असून नागपूरसह अकाेला, अमरावती व वर्धा जिल्ह्यात उष्ण लाटेची परिस्थिती निर्माण हाेण्याचा अंदाज आहे.

एप्रिल महिन्यात ही चार शहरे चांगलीच तापली हाेती. मे ची सुरुवातही उकाड्याने झाली. मधले काही दिवस अवकाळीचे सावट व ढगाळ वातावरणामुळे तापमान ४० अंशाच्या आसपास पाेहचले हाेते पण ९ तारखेपासून पुन्हा सूर्याचे आग ओकणे सुरू झाले आहे. नागपूर वगळता इतर तीन शहरांचे कमाल तापमान सतत तीन दिवसांपासून ४५ अंशाच्या वर गेले आहे. अकाेल्यात बुधवारप्रमाणे गुरुवारीही ४५.९ अंशाची नाेंद झाली आहे. अमरावतीचा पारा ०.६ अंशाने घटला तरी, ताे ४५.२ अंशावर आहे. बुधवारी ४५ वर असलेला वर्ध्याचा पारा गुरुवारी ४५.५ अंशावर उसळला आहे. नागपूरचे तापमान दाेन दिवसात ४४ अंशावर कायम आहे. वाशिम, यवतमाळ व ब्रम्हपुरी ४३ अंशाच्या वर आहेत, तर चंद्रपूर, गडचिराेली ४२ अंश आणि गाेंदिया, भंडारा ४१ अंशाच्यावर आहेत.

हवामान विभागाने येत्या दाेन दिवसात दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे रेड झाेनच्या चार जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशाने वर जाण्याची शक्यता असून वेधशाळेने उष्ण लाटेचा येलाे अलर्ट दिला आहे. यासह अकाेला व वर्धा येथे रात्रीची उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. येथील किमान तापमान अनुक्रमे ३१.५ व ३०.५ अंशावर गेले आहे. उष्ण रात्रीत अमरावतीचाही समावेश आहे.

राज्यात सर्वाधिक तापमानाची शहरे
अकाेला - ४५.९
वर्धा - ४५.५
जळगाव - ४५.५
अमरावती - ४५.२
नागपूर - ४४

Web Title : नागपुर समेत चार शहरों में भीषण गर्मी की चेतावनी; येलो अलर्ट जारी

Web Summary : नागपुर सहित विदर्भ के चार शहरों में तीव्र गर्मी की लहर का खतरा। तापमान में 2-3 डिग्री की वृद्धि की संभावना। अकोला, अमरावती, वर्धा और नागपुर में येलो अलर्ट जारी।

Web Title : Heatwave Alert: Nagpur and Three Other Cities Brace for Scorching Days

Web Summary : Nagpur and three Vidarbha cities face intense heatwave. Temperatures may rise 2-3 degrees. Akola, Amravati, Wardha, and Nagpur are under yellow alert due to high temperatures.