शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीक सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस रुळावरून घसरली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 21:12 IST

बुटीबोरी ते बोरखेडी दरम्यान सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेसचा एक कोच रुळाखाली घसरला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु ५ रेल्वेगाड्यांना २ तास विलंब झाला.

ठळक मुद्देबुटीबोरी-बोरखेडी दरम्यानची घटना : कुठलीही जीवितहानी नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बुटीबोरी ते बोरखेडी दरम्यान सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेसचा एक कोच रुळाखाली घसरला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु ५ रेल्वेगाड्यांना २ तास विलंब झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ डाऊन लाईनवर सिग्नल परिसरात घडली. यात एस ९ कोचची मागील ३ चाके रुळाखाली घसरली.बुटीबोरीजवळ सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सोबतच अ‍ॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन बुटीबोरीला पाठविण्यात आली. रुळाखाली घसरलेली कोचची चाके पुन्हा रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. हे काम २६ मिनिटात पूर्ण करण्यात आले. त्यासाठी या गाडीच्या सुरुवातीच्या तीन कोचला इंजिनसोबत नागपूरला पाठविण्यात आले. यातील प्रवाशांना रेल्वेस्थानकावर नाश्ता, चहाची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली. उर्वरित १६ कोच सकाळी ११.५० वाजता नागपूरला पोहोचले. यातील १५०० प्रवाशांसाठी नि:शुल्क भोजन, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या कामात वाणिज्य कर्मचारी, रेल्वेस्थानकावरील कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सहकार्य केले. कोरोनासाठी रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या मदतीसाठी डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली होती. नागपूरात एस ९ कोचच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त कोच लावण्यात आला. यात प्रवाशांचे सामान कुलींनी नि:शुल्क कोचमध्ये नेले. त्यानंतर दुपारी १२.२० वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. संपूर्ण घटनाक्रमावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार जातीने लक्ष ठेवून होते.पाच रेल्वेगाड्यांना विलंबसिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेसच्या एस ९ कोचची चाके रुळाखाली घसरल्यामुळे पाच रेल्वेगाड्यांना विलंब झाला. यात विदर्भ एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेस आणि अमरावती-अजनी एक्स्प्रेसचा समावेश आहे. या गाड्यांना दीड ते दोन तासांचा विलंब होऊन त्या जागेवरच अडकून पडल्या होत्या.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात