शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ती हुल्लडबाजी मेट्रोच्या बदनामीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:08 IST

नागपूर : सेलिब्रेशन ऑन व्हिल्स उपक्रमात वाढदिवसाच्या नावाखाली मेट्रो रेल्वे बुक करून त्यात हुल्लडबाजी करणे आणि जुगार खेळण्याचा प्रकार ...

नागपूर : सेलिब्रेशन ऑन व्हिल्स उपक्रमात वाढदिवसाच्या नावाखाली मेट्रो रेल्वे बुक करून त्यात हुल्लडबाजी करणे आणि जुगार खेळण्याचा प्रकार महामेट्रोची बदनामी करण्यासाठीच घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी या घटनेला संघटनेची मॉकड्रील असल्याचा दावा केला. मात्र, या घटनेच्या तीन दिवसांनंतर संपूर्ण व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणावरील हवा निघाली आहे. महामेट्रोने ही बाब गांभीर्याने घेत पोलीस तक्रार केल्याने हे प्रकरण आता पाताळयंत्रीपणा करणाऱ्यांवर शेकण्याची शक्यता आहे.

नॉन फेअर रेव्हेन्यू वाढविण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रशासनाने ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’ ही योजना सुरू केली. त्यानुसार, शेखर शिरभाते या व्यक्तीने आपल्या वाढदिवसासाठी मेट्रो रेल्वेचा कोच बुक केला. अ‍ॅक्वा लाइनवर सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंत वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाढदिवसात नाच-गाणे करण्यासाठी तृतीयपंथीयांना नेण्यात आले. तृतीयपंथी नाच-गाणे करीत असताना, वाढदिवसात सहभागी नागरिकांनी त्यांच्यावर पैशांची उधळण केली, तर काही जण जुगार खेळत बसले होते. जुगार खेळताना पैसेही लावण्यात येत होते. हा गंभीर प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून सोइस्करपणे व्हायरलही करण्यात आला. या व्हिडीओमुळे देशभरात नागपूर मेट्रोची बदनामी झाली.

प्रसारमाध्यमांनीही मेट्रोत असे प्रकार सुरू असल्याबाबत गंभीर दखल घेतली होती. मात्र, हा सर्व प्रकार एक पूर्व नियोजित कट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी मेट्रोतील सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी संघटनेने आयोजित केलेली ही मॉकड्रील असल्याचे शनिवारी पत्रकार परिषद घेत सांगितले. यामुळे आता या प्रकरणातील गांभीर्यच निघून गेले आहे.

..........

हुल्लडबाजांनी नागपूरकरांना याची उत्तरे द्यावी

- मॉकड्रीलसाठी दुसऱ्याच्या नावाने बुकिंग का केले?

- प्रकार घडला, त्या दिवशी पत्रकार परिषद का घेतली नाही?

- मेट्रोने तक्रार दिल्यानंतर मॉकड्रीलचे कारण का पुढे केले?

- मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थेत शिरून एखाद्या संघटनेला मॉकड्रील करण्याचा अधिकार आहे काय?

- नागपूरकरांसाठी उभारण्यात आलेही ही व्यवस्था आपणच बदनाम करीत आहोत का?