शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीचे अपघात दावे निकाली

By admin | Updated: June 14, 2015 03:14 IST

विषयनिहाय राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये शनिवारी १ कोटी ४० लाख ८७ हजार ४३७ रुपयांचे मोटार अपघात दावे तडजोडीतून निकाली काढण्यात आले.

नागपूर : विषयनिहाय राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये शनिवारी १ कोटी ४० लाख ८७ हजार ४३७ रुपयांचे मोटार अपघात दावे तडजोडीतून निकाली काढण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवारी जिल्हा न्यायालयात या अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे म्हणाले की, राष्ट्रीय लोक अदालत ही प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणारी सर्वाधिक प्रभावी न्यायिक यंत्रणा आहे. या अदालतीत मोटार अपघात दाव्यांची प्रलंबित असलेली ८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७८ प्रकरणे निकाली निघालीत. प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव एस. एच. ग्वालानी यांनी न्यायाधीश, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असलेले दोन पॅनल तयार केले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रुपालीविरुद्ध मधुकर आणि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी हे प्रकरण समझोता होऊन निकाली निघाले. एकूण ३० लाखांचे हे प्रकरण १८ लाखात निपटले. अपघातात वडिलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर निराश्रित झालेल्या एका १५ वर्षांच्या मुलीला तडजोडीनंतर ७ लाख ६० हजाराचा दावा मंजूर करण्यात आला. न्यायाधीश एम. एस. आझमी आणि ए. व्ही. दीक्षित यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायिक अधिकारी डी. पी. वायकर, व्ही. सी. बरडे, एम. टी. असिम, एस. एच. ग्वालानी आणि एस. बी. गावंडे यांनी या लोक अदालतीचे उत्कृष्ट आयोजन केले होते. (प्रतिनिधी)