शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांना दिलासा,वस्त्यांमध्ये फेरबदल

By admin | Updated: October 8, 2016 03:02 IST

चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या महापालिकेची निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार

नागपूर : चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या महापालिकेची निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली. या सोडतीत बहुतांश नगरसेवकांना दिलासा मिळाला असून त्यांचे प्रभाग सेफ झाले आहेत. महापौर प्रवीण दटके, उपमहापौर सतीश होले, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्यासह महापालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे. काही प्रभागात दोन पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांना एकमेकांविरोधात लढण्याशिवाय पर्याय नाही. काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन ते तीन नगरसेवक एकाच प्रभागात आल्याने त्यांना स्वपक्षातच तिकिटासाठी लढावे लागणार आहे. काही नगरसेकांना मात्र लॉटरीच लागली आहे. त्यांना तब्बल दोन मतदारसंघात पाय ठेवता येणार आहे.
नागपूर महापालिकेच्या ३८ प्रभागातून १५१ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. यातील ५० टक्के म्हणजे ७६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, प्रशांत धवड, गुड्डू तिवारी, अरुण डवरे, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, अपक्ष नगरसेवक परिणय फुके, राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रगती पाटील, दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार यांना नशीबाने साथ दिली आहे तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे, काँग्रेसचे डॉ. प्रशांत चोपडा, शिवसेनेचे बंडू तळवेकर यांचे प्रभाग आरक्षणात फसले आहेत.

या आधारावर झाली सोडत
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गासाठी राखीव तसेच खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या क्रमानुसार राखीव जागांची सोडत काढण्यात आली.
२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. यात अनुसूचित जाती ४ लाख ८० हजार ७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १ लाख ८८ हजार ४४४ इतकी आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या व महापालिकेचे १५१ प्रभाग विचारात घेता प्रत्येक प्रभागात सरासरी ६४८३४ मतदार राहणार असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

जोशी, ठाकरे, यादव कुणाचा त्रिफळा चित ?
प्रभाग क्रमांक १६ मध्ये महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक मुन्ना यादव यांचा जुना प्रभाग संपूर्ण आला आहे. याच प्रभागात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी व अविनाश ठाकरे यांचा अर्धा-अर्धा प्रभाग आला आहे. या प्रभागात एकच जागा खुली आहे. येथील एक जागा अनुसूचित जाती, दुसरी जागा ओबीसी महिला व तिसरी जागा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाली आहे. त्यामुळे या भाजपच्या या तीन दिग्गजांपैकी दोघांचा त्रिफळा चित होणार हे नक्की. त्यातल्या त्यात मुन्ना यादव व अविनाश ठाकरे यांच्यापैकी एकाला आपल्या पत्नीला ओबीसी महिलामधून लढविण्याची संधी आहे. यातही सामना टफ आहे.

ठाकरे की गुडधे ?
प्रभाग क्रमांक ३८ हा शेवटचा व तीन सदस्सीय प्रभाग आहे. या प्रभागात अनुसूचित जाती व सर्वसाधारण या दोन्ही जागा महिलांसाठी राखीव झाल्या. ओबीसीची फक्त एक जागा उरली आहे. या प्रभागात विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या प्रभागातील टाकळीसीम, पूर्णपणे जोडल्या गेले आहे. तर ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या प्रभागातील शिवणगाव, जयताळ्यासह बहुतांश भाग समाविष्ट झाला आहे. सोडत काढतेवेळी गुडधे उपस्थित होते. अनुसूचित जातीची पहिली जागा महिलासाठी आरक्षित होताच ते खूश झाले. ते या प्रभागातून लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसची व्होटबॅक असलेले टाकळीसीम यात आल्यामुळे विकास ठाकरे हे देखील याच प्रभागातून लढतील, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. त्यामुळे आता तिकीटासाठी ठाकरे व गुडधे यांच्यात रस्सीखेच होते की ठाकरे हे शेजारच्या प्रभाग क्रमांक ३७ मधून लढतात याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग ३७ मध्ये गोपालनगर, सुभाषनगर आदी वस्त्यांचा समावेश आहे. येथून ठाकरे यापूर्वी लढले आहेत. प्रभाग ३७ मध्ये एकच जागा खुली आहे. त्यामुळे ठाकरे प्रभाग ३७ मध्ये सरकले तर त्यांचा सामना भाजपचे शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांच्याशी निश्चित मानला जात आहे.
दटके, राऊत, फडणवीस एका प्रभागात
महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत यांच्यासह महिला व बालकल्याण सभापती रश्मी फडणवीस यांचा प्रभाग एकच झाला आहे. प्रभाग क्रमांक १८ मध्ये या सर्वांना एकत्र लढण्याची संधी आहे.
होले-भोयर, धवड-तिवारी एकत्र
प्रभाग ३१ मध्ये उपमहापौर सतीश होले व भाजपचे नगरसेवक डॉ. छोटू भोयर एकाच प्रभागात आले आहेत. यापूर्वी होले यांनी या भागातून निवडणूक लढविली होती. या प्रभागात अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन जागा राखीव असल्याने दोघांनाही संधी आहे. काँग्रेसचे प्रशांत धवड व योगेश तिवारी यांनाही संधी आहे. त्यामुळे या प्रभागात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. नगरसेविका दिव्या घुरडे, सारिका नांदूरकर ,सुजाता कोंबाडे यांनाही या प्रभागात संधी आहे.