आरक्षण उपवर्गीकरणावर रविवारी नागपुरात चिंतन परिषद; अनुसूचित जातींमधील विविध प्रतिनिधींचे एकत्र चिंतन

By आनंद डेकाटे | Updated: May 18, 2026 20:26 IST2026-05-18T20:15:56+5:302026-05-18T20:26:26+5:30

Nagpur : अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Reflection conference on reservation sub-categorization in Nagpur on Sunday; Various representatives from Scheduled Castes to reflect together | आरक्षण उपवर्गीकरणावर रविवारी नागपुरात चिंतन परिषद; अनुसूचित जातींमधील विविध प्रतिनिधींचे एकत्र चिंतन

Reflection conference on reservation sub-categorization in Nagpur on Sunday; Various representatives from Scheduled Castes to reflect together

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

 लॉर्ड बुद्धा टिव्ही, राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लहू सेना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून डाॅ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले करतील. तरप्रमुख वक्ते म्हणून प्रा. सुकुमार कांबळे, प्रा. रामचंद्र भराडे, डॉ. अंकुश गोतावळे, राजेश घोड़े, प्रा. मुकेश दुपारे, डॉ. रविंद्र मुंद्रे, प्रा. किशोर बिरला, डॉ. पुरणचंद्र मेश्राम, प्रा संदेश वाघ, रत्नसिंग बावरी, जयसिंग कछवाह, नागेश मानकर, विशाल लारोरकर, भैय्याजी खैरकर आणि संजय कठाळे उपस्थित राहतील.

या चिंतन परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जातींमधील विविध समाजघटकांचे प्रश्न, उपवर्गीकरणाबाबतचे मतप्रवाह आणि सामाजिक समन्वयाचा मार्ग यावर व्यापक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजक सचिन मून, प्रशांत शहारे, राकेश भास्कर, भैय्याजी खैरकर आणि प्रा. विनोद बागडे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : नागपुर में अनुसूचित जातियों के लिए आरक्षण उप-वर्गीकरण पर चिंतन परिषद

Web Summary : अनुसूचित जातियों के लिए आरक्षण उप-वर्गीकरण पर एक राज्य-स्तरीय चिंतन परिषद 24 मई को नागपुर में आयोजित की जाएगी। लॉर्ड बुद्धा टीवी और अन्य द्वारा आयोजित इस कार्यक्रम का उद्देश्य समुदाय के भीतर मुद्दों, विचारों और सामाजिक सद्भाव पर चर्चा करना है।

Web Title : Nagpur to host conference on reservation sub-categorization for Scheduled Castes.

Web Summary : A state-level conference on reservation sub-categorization for Scheduled Castes is set to take place in Nagpur on May 24th. The event, organized by Lord Buddha TV and others, aims to discuss issues, opinions, and social harmony within the community.