अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी 'झळाळी'; नागपूरच्या सराफांची 'ऑफर'ची बरसात

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 19, 2026 16:40 IST2026-04-19T16:39:14+5:302026-04-19T16:40:29+5:30

Nagpur : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह नागपूरच्या सराफा बाजारात ओसंडून वाहत आहे. मात्र, यंदा सोन्या-चांदीच्या किमतींनी घेतलेली गगनभरारी पाहून ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत.

Record 'surge' in gold and silver prices on Akshaya Tritiya; Nagpur jewelers shower 'offers' | अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी 'झळाळी'; नागपूरच्या सराफांची 'ऑफर'ची बरसात

Record 'surge' in gold and silver prices on Akshaya Tritiya; Nagpur jewelers shower 'offers'

मोरेश्वर मानापुरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह नागपूरच्या सराफा बाजारात ओसंडून वाहत आहे. मात्र, यंदा सोन्या-चांदीच्या किमतींनी घेतलेली गगनभरारी पाहून ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात (२४ कॅरेट) तब्बल ६१,१०० रुपयांची, तर किलोच्या चांदीमध्ये १.६९ लाखांची अवाढव्य वाढ झाली असूनही, नागपूरकर या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सज्ज झाले आहेत.

दमदार दरवाढ, गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठा फरक

यंदा रविवार, १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी होत आहे. मात्र, त्याआधीच १६ एप्रिल रोजी बाजारात सोने-चांदीच्या किमर्तीनी नवे उच्चांक गाठले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे दर (३ टक्के जीएसटीसह) खालीलप्रमाणे आहेत.

गुंतवणुकीवर 'बंपर' परतावा; शेअर बाजार फिका

गेल्यावर्षीच्या (३० एप्रिल) अक्षय तृतीयेपासून आतापर्यंत ग्राहकांना दोन्ही मौल्यवान धातूंनी गुंतवणुकीवर 'बंपर' परतावा दिला. या परताव्यासमोर शेअर बाजारही फिका ठरला. वर्षभरात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ६३ टक्के परतावा मिळाला. चांदीने तर सर्वच गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडीत काढले असून, गुंतवणूकदारांना एका वर्षात तब्बल १७० टक्के इतका भरघोस परतावा मिळाला.

ग्राहकांचे लक्ष १९ एप्रिलकडे

सध्याची दरवाढ पाहता, अक्षय तृतीयेच्या मुख्य दिवशी म्हणजे १९ एप्रिलपर्यंत सोन्याचे भाव नेमके कुठे स्थिरावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किमती कितीही वाढल्या तरी 3 अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बाजारात गर्दी होईलच, असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत. आता या महागाईच्या झळाळीत ६ नागपूरकर सोने-चांदीच्या खरेदीला किती प्रतिसाद देतात आणि सराफा बाजारात किती कोटींची उलाढाल होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

नागपूरच्या सराफांची 'ऑफर'ची बरसात

  • वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा उत्साह कमी होऊ नये, यासाठी नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांनी अक्षय तृतीयेनिमित्त विविध आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत.
  • काही शोरुम्सने ठराविक खरेदीवर करात सवलत दिली आहे. तर काहींनी करमुक्त खरेदीची ऑफर आणली आहे.
  • दागिने घडणावळीच्या शुल्कात मोठी सवलत देऊन ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
  • आधीच्या किमतीत बुकिंग करून सोने सणाच्या दिवशी घरी नेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

Web Title : अक्षय तृतीया: सोने की कीमतों में उछाल, नागपुर के जौहरियों की पेशकश।

Web Summary : अक्षय तृतीया पर सोना और चांदी की कीमतें बढ़ीं, फिर भी नागपुर के निवासी खरीदने के लिए तैयार हैं। सोने ने 63% और चांदी ने साल भर में 170% रिटर्न दिया। जौहरी बिक्री बढ़ाने के लिए छूट और कर लाभ दे रहे हैं।

Web Title : Akshaya Tritiya: Gold prices soar, Nagpur jewelers offer deals.

Web Summary : Gold and silver prices surge for Akshaya Tritiya, yet Nagpur residents prepare to buy. Gold yielded 63% returns, silver 170% over the year. Jewelers offer discounts and tax benefits to boost sales.