शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

काळाच्या ओघात राम गणेश गडकरींचे विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मराठी नाट्यसाहित्याला ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ’राजसंन्यास’ यांसारखी नाटके देणारे राम गणेश गडकरी, संवेदना फुलविणारे काव्य लिहिणारे गोविंदाग्रज आणि विनोदी लेखनातून हास्यांचा पेटारा खोलणारे बाळकराम यांची २३ जानेवारी २०२१ रोजी १०२ वी पुण्यतिथी आहे. मात्र, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाची वाणवाच दिसून येते. कारणे कोरोनाची सांगितली जातील आणि झालेल्या विस्मरणावर पांघरुण टाकले जाईल, हे वास्तव आहे.

मृत्यूसवे ओसणारा काळ व्यक्तीचे स्मरण पुसट करत जातो. व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या कृती अन् साहित्य इतिहासात कोरल्या जातात. काही दिवस त्या उल्लेखनीय कार्याचा गलबला केला जातो आणि नंतर तोही शांत होतो. याचा प्रत्यय प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या रूपाने दिसून येतो. उणे-पुरे १७-१८ दिवसांचा सहवास नागपूर-सावनेरच्या वाट्याला त्यांचा आला. लाभलेला हा सहवास त्यांच्या अखेरच्या श्वासाचा होता. त्याचमुळे सावनेरशी त्यांचे नाव जोडले गेले आणि जागतिक नाट्यविश्वात सावनेर अमर झाले. असे असले तरी त्यांचे वास्तव्य झालेल्या त्या घराशिवाय, बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाशिवाय आणि एका पुतळ्याशिवाय दुसरे काहीच नाही. घराला घरपण कुटुंबातील सदस्यांमुळे असते. अगदी तसेच मोठ्या नावाचे जागरण त्यांच्या कलाकृतींच्या अस्तित्वामुळे असते. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे नागपूर व सावनेर येथील काही गडकरीप्रेमी लोकांनी गडकरी यांच्या स्मारकरूपी घराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली होती. शिवाय, घरात टांगण्यात आलेल्या गडकऱ्यांच्या फोटोंना संदर्भ कथा जोडण्यासोबतच घराच्या मागील वऱ्हांड्यात छोटे ऑडिटोरियम साकारण्याचा विचार होता. मात्र, बोलणी आणि करणी यात जे अंतर दिसून येते, ते येथेही दिसून आले. हळूहळू तो मुद्दाच मागे सरला. नाट्यपरिषदेकडूनही नाट्यउपक्रम वगळता केवळ फोटोला हार घालून बोलघेवड्या वचनांची बरसातच केली जाते. त्यामुळे पुढच्या पिढीपुढे राम गणेश गडकरी म्हणजे कोण, असाच प्रश्न पडणार हे निश्चित.

नाट्यपरिषदेचा महोत्सव आजवर न झाला

- तीन वर्षापूर्वी राम गणेश गडकरी यांच्या पुण्यस्मरण शताब्दी वर्षानिमित्त रा.ग. महोत्सव घेण्याची घोषणा नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेतर्फे करण्यात आली होती. मात्र, घोषणेचा विसर पडला आणि ना शताब्दी साजरी झाली ना तो महोत्सव. आजही अनेक रंगकर्मी या महोत्सवाची वाट बघत आहेत, हे विशेष.

.........