शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

Rain : नागपूरमध्ये अवकाळीचा हाहाकार ! कळमना मार्केटमध्ये उघड्यावरील कोट्यवधींचा शेतमाल भिजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:52 IST

Nagpur : विदर्भात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला आहे. नागपुरात काल मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने नागपूरच्या कळमना बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला शेतमाल पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

नागपूर :  विदर्भात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला आहे. नागपुरात काल मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने नागपूरच्या कळमना बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला शेतमाल पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन विक्रीच्या वेळी निसर्गाचा हा कोप झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून, बाजार परिसरात हताश करणारे चित्र पाहायला मिळत आहे.

​संरक्षण व्यवस्था नसल्याने फटका कळमना ही विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते, जिथे दररोज हजारो क्विंटल धान्य आणि इतर पिके विक्रीसाठी येतात. मात्र, ही बाजारपेठ खुली असल्याने आणि तिथे पावसापासून संरक्षणाची कोणतीही ठोस शेडची व्यवस्था नसल्याचे आज पुन्हा एकदा उघड झाले आहे. काल रात्री अचानक आलेल्या पावसाने उघड्यावर पडलेले धान्य, सोयाबीन आणि इतर पिकांच्या राशी पूर्णपणे ओल्या झाल्या. बाजार समितीच्या ढसाळ नियोजनामुळे कष्टाने पिकवलेला हा शेतमाल आज मातीमोल होण्याची वेळ आली आहे.

​गुणवत्ता खालावली, भावाचा प्रश्न गंभीर पावसात भिजल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. धान्य ओले झाल्याने त्याला लवकर कीड लागण्याची किंवा ते सडण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, या भिजलेल्या मालाला बाजारात योग्य भाव मिळेल की नाही, याबद्दल मोठी साशंकता आहे. व्यापारी अशा मालाला अत्यंत कमी दराने मागणी करत असल्याने, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रशासनाकडून मदतीची मागणी दिवसरात्र शेतात राबून आणि मोठ्या अपेक्षेने बाजारात आणलेला माल डोळ्यांदेखत वाया गेल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. केवळ व्यवस्थापनाच्या अभावामुळे आणि पावसाळी शेड नसल्यामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे. आता झालेल्या या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने आणि बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :RainपाऊसnagpurनागपूरVidarbhaविदर्भ