शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पंपचालक पेट्रोल-डिझेल लिटरमध्ये विकण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:15 IST

पेट्रोल आणि डिझेल लिटरमध्ये विक्री करण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निर्णयाचे शहरातील पंपचालकांनी स्वागत केले आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री रुपयांमध्ये नव्हे तर लिटरमध्ये व्हावी, यावर पंपचालक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माहिती देणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार : एक लिटरपेक्षा कमी विक्रीवर आपत्ती

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल आणि डिझेल लिटरमध्ये विक्री करण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निर्णयाचे शहरातील पंपचालकांनी स्वागत केले आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री रुपयांमध्ये नव्हे तर लिटरमध्ये व्हावी, यावर पंपचालक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माहिती देणार आहे.पेट्रोल आणि डिझेल रुपयात नव्हे तर लिटरनुसार विक्री करावी, अशा संदर्भाचे पत्र वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक एस.एस. काकडे यांनी बीबीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांना पाठविले होते, हे विशेष. या आधारावर त्यांनी पेट्रोलियम कंपन्यांना लिटरनुसार विक्री करण्यास सांगितले आहे.विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील सर्वच पंपाचालक पेट्रोल व डिझेल लिटरमध्ये विकण्यास तयार आहेत. तसे पाहता मेडको, टोकेम, गिलबर्को, ड्रेसर वेन या मशीन बनविणाऱ्या कंपन्या मशीनला लिटरनुसार सेट करते. त्यांचा एमएसक्यू (मिनिमम मेजरड् क्वान्टिटी) दोन वा पाच लिटरचा असतो. यामध्ये विक्रीत कमी-जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरून मशीनची स्टॅम्पिंग लिटरमध्ये होते. नियमानुसार पंप चालविण्याची चालकांची तयारी आहे. याकरिता सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पेट्रोल आणि डिझेलची विक्री केवळ लिटरमध्ये करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार आहे. पंपचालक एक लिटरपेक्षा कमी विक्री करणार नाही, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.दंडाची तरतूदलीगल मेट्रोलॉजी कायद्यानुसार पेट्रोल आणि डिझेलची विक्री लिटर प्रमाणात झाली पाहिजे. असे न केल्यास दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. २०, ३० आणि ५० रुपयांचे पेट्रोल विकल्यामुळे पंपचालकांचे नुकसान होते तसेच मानवीश्रम आणि वेळ वाया जातो.चिल्लर पैशांची तरतूद कशी होणार?लिटरनुसार विक्री करण्यात सर्वात मोठी समस्या पेट्रोलच्या दरासंदर्भात आहे. दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर पैशात वाढतात. गुरुवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९ रुपये ५ पैसे होते. अशावेळी ग्राहक एक लिटर पेट्रोल भरत असेल तर त्याला ९५ पैसे परत करणे कठीण होणार आहे. प्रत्येक ग्राहकाच्या संदर्भात पैसे परतीची तरतूद पंपचालक कशी करणार, हा गंभीर प्रश्न आहे. पंपावर दररोज चिल्लर गोळा करणे कठीण होणार आहे. ही बाब पंपचालकांना शक्य नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर रुपयांत ठेवण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी तरतूद करावी, असे असोसिएशनचे मत आहे. त्यामुळे ग्राहकांसोबत पंपचालकांची सोय होणार आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल