शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी संमेलनात सहा प्रकल्पांचे सादरीकरण

By admin | Updated: April 6, 2017 02:25 IST

नागपूर महापालिकेच्यावतीने ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी’ प्रकल्पाचा उद्देश लोकांपर्यंत

मनपा प्रशासन सज्ज : १०० महापौरांसह ५०० मान्यवर निमंत्रित नागपूर : नागपूर महापालिकेच्यावतीने ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी’ प्रकल्पाचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून त्याचा प्रसार करण्यासाठी नोएडा येथील इलेटस् टेक्नोमीडिया प्रा.लि. यांच्या सहकार्याने ७ आणि ८ एप्रिल रोजी आयोजित स्मार्ट सिटी शिखर संमेलनात महापालिकेच्या सहा प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, हिट अ‍ॅक्शन प्लॅन, आॅरेंज सिटी स्ट्रीट, ग्रीन बस वाहतूक व नागपूर स्मार्ट आणि सुरक्षित सिटी प्रकल्पांचा यात समावेश आहे. या शिखर संमेलनात स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या देशभरातील १०० महापालिकांचे महापौर, आयुक्त, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. काही महापौरांकडून संमेलनात सहभागी होण्याला होकार मिळाला आहे. महापालिकेच्या नागपूर स्मार्ट आणि सुरक्षित सिटी प्रकल्पांतर्गत सिटी नेटवर्क, वायफाय सिटी, सुरक्षेसाठी शहरात चार हजार सीसीटीव्ही बसविणे, स्मार्ट वाहतूक, स्मार्ट पथदिवे, स्मार्ट वाहतूक नियंत्रण, स्मार्ट पार्किंग व स्मार्ट पर्यावरण आदींचा समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध शहरात सुरू असलेल्या उपक्रमांच्या माहितीची देवाण-घेवाण या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. ‘स्मार्ट आयडिया’ मांडण्याच्या आणि त्या अमलात आणण्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने नागपूर कसे चांगले शहर आहे, याची शिखर संमेलनात मांडणी करण्यात येईल, अशी माहिती अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिली. विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी खासगी आणि सहकार क्षेत्रातील देशभरातील विचारवंत, धोरण तयार करणारे, उद्योग तज्ज्ञ आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित अन्य भागधारक आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील स्मार्ट नागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने अनुभव आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्यासाठी या संमेलनाच्या निमित्ताने चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचा विश्वास सोनवणे यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)