शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवालदाराला मारहाण

By admin | Updated: November 22, 2014 02:26 IST

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या एका पोलीस हवालदाराला दोघांनी मारहाण केली.

नागपूर : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सरसावलेल्या एका पोलीस हवालदाराला दोघांनी मारहाण केली. महेंद्र शत्रुघ्न त्रिपाठी (वय १९) आणि संतोष शत्रुघ्न त्रिपाठी (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत. ते भरतवाडा, गुलमोहरनगर चौकाजवळ राहतात.बुधवारी सायंकाळी कळमन्यातील मिनी मातानगरात मेहता धर्मकाट्याजवळ भरधाव ट्रकने एका शाळकरी मुलाला चिरडले. यामुळे संतप्त जमावाने गुरुवारी सकाळी या धर्मकाट्याजवळ जोरदार आंदोलन केले. यावेळी या भागातील बेशिस्त वाहनचालकांना वळण लावण्यासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी जमावाने केली. त्यानुसार तेथे पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. इंदोरा, वाहतूक शाखेचे हवलदार संजय रामटेके आज दुपारी आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना एमएच ३१/ सीव्ही ६०९८ चा टॅ्रक्टरचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसला. त्यामुळे रामटेके यांनी त्या ट्रॅक्टरचालकाला थांबवून त्याच्यावर चालान कारवाई केली. त्यामुळे संतप्त झालेल्या महेंद्र आणि संतोषने रामटेकेंना अश्लिल शिवीगाळ केली. त्यांच्या हातातील चालान पावती फाडून आरोपींनी रामटेकेंना मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकाराची माहिती देऊन रामटेके यांच्या सहकाऱ्यांनी माहिती देऊन घटनास्थळी पोलीस ताफा बोलवून घेतला. त्यांनी त्रिपाठी बंधूंना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. ठाण्यातही आरोपींनी गोंधळ घातला. पाहून घेण्याची धमकी दिली. पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली.(प्रतिनिधी)